Friday, August 14, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली शहरात मुला-मुलींचे प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे...

गडचिरोली शहरात मुला-मुलींचे प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे मंजूर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित,दर्जेदार आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने समाज कल्याण विभागामार्फत गडचिरोली शहरात मुलांसाठी व मुलींसाठी प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे मंजूर करण्यात आली आहेत.या दोन्ही वसतिगृहांच्या उभारणीसाठी प्रत्येकी २८ कोटी रुपये,असा एकूण ५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून,हा प्रकल्प जिल्ह्यातील उच्च शिक्षणासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र पाच मजली भव्य इमारती उभारण्यात येणार असून, त्यामध्ये एकूण ५०० विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था उपलब्ध होईल.वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज निवास व्यवस्था,भोजनाची सुविधा,अभ्यासिका, स्वच्छता सुविधा,सुरक्षित वातावरण तसेच शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जिल्हा मुख्यालयी येतात.मात्र राहण्याची व जेवणाची सुविधा,सुरक्षित निवासाची कमतरता आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवणे कठीण जाते.नवीन वसतिगृहांमुळे विद्यार्थ्यांना अल्प खर्चात सुरक्षित व दर्जेदार निवास उपलब्ध होणार असून,त्यांना शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करता येणार आहे.
या सुविधेमुळे विशेषतः ग्रामीण,दुर्गम व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.विद्यार्थ्यांचा प्रवासाचा वेळ व खर्च कमी होण्याबरोबरच शिक्षणातील गळती कमी करण्यास आणि उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासही या प्रकल्पाची मदत होणार आहे.
समाज कल्याण विभागाच्या नियोजनानुसार पुढील दोन ते तीन वर्षांत या दोन्ही वसतिगृहांच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण करून विद्यार्थ्यांसाठी त्या सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे.
याबाबत माहिती देतांना सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी सांगितले की, “गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात अनेक विद्यार्थी केवळ राहण्याच्या सुविधेअभावी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात.नवीन वसतिगृहे सुरू झाल्यानंतर ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित निवास,भोजन आणि अभ्यासासाठी आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल आणि जिल्ह्यातील उच्च शिक्षण अधिक सक्षम होईल.”
समाज कल्याण विभागाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग अधिक सुलभ होणार असून,शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

घोरपडींच्या शिकार प्रकरणी चौघांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या पवनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सावंगी बिटात दोन घोरपडींची शिकार करून त्यांचे मांस कापतांना चौघांना वन विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक करून घटनास्थळावरून...

दुचाकीची पीकअपला जोरदार धडक; तरुणाचा जागीच मृत्यू.. – देसाईगंजच्या कुरुड फाट्यावरील आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुका मुख्यालयापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरुड फाटा बसस्थानक नजीक दुचाकीची समोरून येणाऱ्या पीकअपला जोरदार धडक बसल्याने घडलेल्या अपघातात २० वर्षीय...

परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम; गडचिरोलीतील स्टील हब व कौशल्य विकासाला चालना- उद्योगमंत्री उदय सामंत – ३६ हजार २११ कंपन्यांची नोंदणी रद्द झाल्याच्या...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रातून उद्योग इतर राज्यांत स्थलांतरित झाल्याचे तसेच राज्यातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याचे आरोप चुकीचे आहेत. महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर...

राज्य शासनाकडून स्वतंत्र ‘गडचिरोली प्रदेश’ घोषित.. – मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वेगाने होत असलेले औद्योगिकीकरण,वाढत्या पायाभूत सुविधा आणि भविष्यातील विकासाच्या गरजा लक्षात घेऊन राज्य शासनाने संपूर्ण गडचिरोली महसुली जिल्ह्याचा समावेश असलेला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!