Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली विधानसभा निवडणूक : आरमोरीतून १२,गडचिरोलीतून १४ तर अहेरीतून १४ उमेदवार निवडणुकीच्या...

गडचिरोली विधानसभा निवडणूक : आरमोरीतून १२,गडचिरोलीतून १४ तर अहेरीतून १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात… – त्रुटी अभावी तनुश्री आत्राम यांचे उमेदवारी अर्ज बाद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात आज बुधवारी नामनिर्देशनपत्रांची छाननी संबंधीत निवडणुक निरीक्षक व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली.यात कालपर्यंत दाखल करण्यात आलेल्या एकूण ६५ नामनिर्देशन अर्जापैकी ५२ अर्ज वैध ठरले तर १३ अर्ज अवैध ठरले आहेत.
आरमोरी विधानसभा निवडणुकीसाठी १४ उमेदवारांनी दाखल केलेल्या २० अर्जापैकी १२ उमेदवारांचे १८ नामनिर्देशनपत्र वैध ठरले आहे. दामोधर तुकाराम पेंदाम व निलेश छगनलाल कोडापे यांचे नामनिर्देशन अवैध ठरले.
गडचिरोली विधानसभा निवडणुकीसाठी १४ उमेदवारांनी दाखल केलेल्या २२ अर्जापैकी १४ उमेदवारांचे १९ अर्ज वैध ठरले तर ३ अर्ज अवैध ठरले मात्र,त्यांचे एकापेक्षा अधिक दाखल केलेले अर्ज वैध ठरल्याने उमेदवारांची संख्या कमी झाली नाही.
अहेरी विधानसभा मतदार संघासाठी १६ उमेदवारांनी दाखल २३ अर्जापैकी १४ उमेदवारांचे १५ अर्ज वैध ठरले.तनुश्री धर्मरावबाबा अत्राम व पोरतेट ऋषी बोंदय्या या दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले.
एबी फॉर्म विहित नमुन्यात सादर न केल्याने तसेच नामनिर्देशन पत्रावर दहा सूचकांच्या स्वाक्षऱ्या नसल्याने उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!