उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्हा पोलिस दल तथा मैत्री परिवार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील अतिदुर्गम,नक्षलग्रस्त भागातील आदिवासी युवक,युवती व आत्मसमर्पित नक्षल जोडप्यांचा विवाह सोहळा आज २६ मार्च २०२३ रोजी चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॉन येथे सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मोठ्या थाटात संपन्न झाला.

जिल्ह्यातील आदिवासी समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकूवत आणि आत्मसमर्पित नक्षलवादी युवक युवतींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या तसेच नागरिकांच्या मनातील भय दूर करण्यासाठी जिल्हा पोलिस विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे. याअंतर्गत जिल्हा पोलिस दल तसेच मैत्री परिवार संस्था यांच्या पुढाकारातून अतिदुर्गम भागातील १२७ आदिवासी युवक व युवतींचा सामूहिक विवाह सोहळा आज पार पडला.यात ८ आत्मसमर्पित नक्षली युवक-युवतींचा समावेश आहे.विवाह सोहळ्याला पोलिस अधीक्षक नीलोत्पल,अप्पर पोलिस अधीक्षक अनुज तारे,अप्पर पोलिस अधीक्षक कुमार चिंता,अप्पर पोलिस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख,नागरी कृती शाखा प्रभारी अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक धनंजय पाटील,पोलिस उपनिरीक्षक सागर झाडे,खासदार अशोक नेते,प्रा.मूनिश्र्वर बोरकर,जिल्ह्यातील पदाधिकारी,कर्मचारी व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.