Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेतील २५ वे सत्र संपन्न…-२५ व्या सत्रात पुनाजी कोटरंगे...

गडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेतील २५ वे सत्र संपन्न…-२५ व्या सत्रात पुनाजी कोटरंगे विजयी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच’ गडचिरोली च्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार सदर उपक्रमाचे पंचेविसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३५  कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील कवी पुनाजी कोटरंगे यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “तो माझा बाप” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 

पुनाजी कोटरंगे हे मौजा- गायडोंगरी,ता.सावली, जिल्हा- चंद्रपूर, येथील रहिवासी असून नवोदित कवी आहेत.त्यांचे रोमन नावाचे कवितासंग्रह प्रकाशित झालेले असून अनेक कवितांचे लेखन त्यांनी केले आहे.अनेक वृत्तपत्रांतून त्याच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.‌अरुण बुरे,दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

या २५ व्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने मिलींद खोब्रागडे,नरेंद्र गुंडेली,प्रिती ईश्वर चहांदे,अजय राऊत, जयराम धोंगडे,सोनाली रायपुरे (सहारे),गणेश रामदास निकम,संजय बन्सल,अतुल काशिनाथ गंडाटे,संगीता ठलाल,अशोक मांदाडे,तुळशीराम उंदीरवाडे,मुरलीधर खोटेले,पी.डी. काटकर,वंदना सोरते,सुरज गोरंतवार,रोहिणी पराडकर,डॉ.चंद्रकांत लेनगुरे,सुरेश गेडाम,वंदना मडावी,प्रभाकर दुर्गे,भिमानंद मेश्राम,  स्वप्नील बांबोळे,प्रियंका वाकडे,प्रा.रेखा दिक्षित,संदिप आंबोरकर,पुनाजी कोटरंगे,मधुकर दुफारे,रंजना चुधरी, संतोष कपाले,खुशाल म्हशाखेत्री,रोशन येमुलवार, हरिष नैताम,सुजाता अवचट,डॉ.मंदा पडवेकर इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.

सदर स्पर्धेचे पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे चुडाराम बल्हारपुरे (नाटककार) कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!