Tuesday, July 28, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात ५५.१ मी.मी.पावसाची नोंद; २४ तासाचे यलो अलर्ट…-गोसीखुर्द धरणाचे ३३ पैकी...

गडचिरोली जिल्ह्यात ५५.१ मी.मी.पावसाची नोंद; २४ तासाचे यलो अलर्ट…-गोसीखुर्द धरणाचे ३३ पैकी १९ गेट तर चिचडोह बॅरेज चे ३८ पैकी ३८ गेट उघडले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यातील बाराही तालुक्यात बुधवारी,दिनांक-१७ जुलै रोजी पडलेल्या मुसळधार पावसाची आज,१८ जुलै ला नोंद करण्यात आली आहे.नोंदीनुसार गडचिरोली जिल्ह्यात एकूण सरासरी ५५.१ मि.मी.पाऊस पडलेला असून ४० पैकी १४ मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे.त्यानुसार धरणातील पाणी साठा व विसर्ग तपशील पुढीलप्रमाणे दर्शविण्यात आला आहे.

वैनगंगा नदी :-गोसीखुर्द धरणाचे ३३ पैकी १९ गेट उघडलेले असुन २,२१४ क्युमेक्स (७८,१८७ क्युसेक्स) विसर्ग आहे.चिचडोह बॅरेज चे ३८ पैकी ३८ गेट उघडलेले असुन विसर्ग ४,३२३ क्युमेक्स (१५२६६७ क्युसेक्स)आहे.देसाईगंज,वाघोली व आष्टी या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वैनगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. 

वर्धा नदी :-निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ पैकी सर्व ३१ गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे.बामणी (बल्हारशा) व सिरपूर टाऊन या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वर्धा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. 

प्राणहिता नदी :-दिना प्रकल्प ६३ टक्के भरलेला असून सांडव्यावरुन विसर्ग निरंक आहे.महागांव सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार प्राणहिता नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.

गोदावरी नदी :-श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पाचे ६२ पैकी ६२ गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे.लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे ८५ पैकी ८५ गेट उघडलेले असुन विसर्ग १५१२ क्युमेक्स (५३४०० क्युसेक्स) आहे. बॅरेजची पाणी पातळी ८९.९० मी.असुन पूर्ण संचय पातळीच्या १०.१० मी.ने खाली आहे.कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार गोदावरी नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. 

इंद्रावती नदी :-जगदलपूर,चिंदनार,तुमनार व पाथागुडम या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इंद्रावती नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. 

इशारा :-नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे स्थानिक तसेच वैनगंगा,प्राणहिता,वर्धा, गोदावरी व इंद्रावती या मुख्य नद्यांची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.तसेच गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणातून ५ हजार क्युमेक्स पर्यंत विसर्ग टप्याटप्याने प्रवाहीत करण्यात येणार असल्याने वैनगंगा नदी काठावरील गावातील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी तसेच नदी पात्रात आवागमन करु नये. 

हवामान संदेश :-भारतीय हवामान विभागाचे नागपूर,भोपाल,रायपूर व हैद्राबाद केंद्र यांचे दिनांक-१७ जुलै रोजीच्या पर्जन्यमान इशारा संदेशानुसार वैनगंगा,प्राणहिता,वर्धा,इंद्रावती व मध्य गोदावरी या उपखोऱ्यातील काही भागात पुढील ४८ तासाकरीता मुसळधार स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता असल्याचे संकेत दिलेले आहे.तसेच गडचिरोली जिल्ह्यात २४ तासाकरीता पर्जन्यमानाचा येलो अलर्ट दिलेला असून काही ठिकाणी ‘फ्लॅश फ्लड रिस्क’चे संकेत दिलेले असल्याने उचित दक्षता घेण्याचे कळविण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!