उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्याचा पदभार सांभाळताच सर्व अवैध धंदेवाले व अवैध धंदे वाल्यांकडून पैसे घेणाऱ्यांची दुकानदारी बंद झाली होती. त्यानुसार बरेच महिने अवैध दारू विक्री व सट्टा-पट्टीला लगाम लावण्यात आले होते.दारू बंदी ही केवळ नामधारी होती.काही बलाढ्य व्यक्तींकडून स्वतः लिहून घेऊन अहवाल पाठविण्यात आला होता.हे तितकेच खरे असल्याची चर्चा जनमानसात सुरू होती.मात्र हल्ली काही बाहेर तालुक्यातील दुसऱ्या तालुक्यात उडी घेऊन; सट्टा-पट्टीचा व्यवसाय जोमाने करतांना दिसून येतात.अशातच सर्वांचे खिसे गरम होत आहेत की काय? त्यामुळेच ‘तेरी भी चूप ओर मेरी भी चूप’ असा प्रकार हल्ली निदर्शनास येऊ लागला असल्याने पूर्वी करण्यात येणाऱ्या कारवाईस काहीही अर्थ उरत नसल्याने अनेक जणांकडून ताशेरे ओढले जात आहे.
कधीही न घडणारे चित्र गडचिरोली जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांच्यामुळे घडू लागले होते.अवैध धंदे करणारे बलाढ्य व्यक्ती भूमिगत झाले होते.त्यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिक पोलीस अधीक्षक यांचे पत्ररुपी आभार मानण्यासाठी तयार झाले होते.मात्र हल्ली अवैध दारू विक्री व अवैध सट्टा-पट्टीला उधाण येऊ लागल्याने ‘जैसे थे अवस्था’ निर्माण झाली आहे.जर कां एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाची पावती फाडतो म्हटले तर आमच्याकडे काहीच नाही?….सर्व अवैध धंदे बंद आहेत.अशी बतावणी केली जात असल्याचा प्रकार निदर्शनास येऊ लागला आहे. त्यानुसार सर्व कार्यकर्ते केवळ अवैध धंद्यांवरच अवलंबून असतात की काय?असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे.अशातच बाहेर तालुक्यातून अवैध धंदे करण्यासाठी व व्हॉटसअप वर सट्टा-पट्टी घेणाऱ्यांचे काय? यांच्याकडे लक्ष घालणार कोण? अशी चर्चा सर्वत्र जिल्ह्यात सुरू आहे.अशांवर त्वरित आवर घालणे आवश्यक आहे.अन्यथा ‘गोरगरीबांची घरे उद्ध्वस्त तर त्यांची घरे मस्त’असे चित्र सर्वत्र निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
पुढील वृत्त…अवैध धंदे सुरू असणाऱ्या दक्षिणेकडील तालुक्याचे