Tuesday, September 8, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात तिरंदाजी खेळाचे प्रशिक्षण केंद्र; आष्टी येथे खेळाडू निवड चाचणीचे...

गडचिरोली जिल्ह्यात तिरंदाजी खेळाचे प्रशिक्षण केंद्र; आष्टी येथे खेळाडू निवड चाचणीचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयामार्फत खेलो इंडिया आर्चरी प्रशिक्षण केंद्र(आष्टी)अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आर्चरी(तिरंदाजी)खेळाचे प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले आहे.या केंद्रात ३० प्रशिक्षणार्थी व एक प्रशिक्षक अशी व्यवस्था करण्यात आली असून,प्रशिक्षणासाठी १४ वर्षांखालील(मुले व मुली)खेळाडूंच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर निवड चाचणी येत्या ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ वाजता महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ हायस्कूल तथा महाविद्यालय,आष्टी,ता.चामोर्शी,जि.गडचिरोली येथे होणार आहे.या निवड चाचणीतून पात्र खेळाडूंची खेलो इंडिया आर्चरी प्रशिक्षण केंद्र,आष्टी येथे नियमित प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे.निवड चाचणीसाठी सहभागी खेळाडूंनी जन्म प्रमाणपत्र,आधार कार्ड,बोनाफाईड प्रमाणपत्र व पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत आणणे आवश्यक आहे.
  • निवड प्रक्रियेतील चाचण्या👇
१. शारीरिक चाचण्या
धावणे (मुले –२.४ किमी,मुली – १.६ कि.मी.)
हृदयगती चाचणी
बो हँड होल्डिंग
पुश-अप,सिट-अप
सिट अँड रीच
प्लँक टेस्ट
व्हर्टिकल जंप
ब्रॉड जंप
२. कौशल्य चाचण्या
ड्रॉ
अँकर
फॉलो-थ्रू
रिलीज
टी-स्टान्स
लेफ्ट एल्बो तंत्र
३. मानसिक क्षमता चाचण्या 
एकाग्रता
बुद्धिमत्ता
प्रतिक्रिया क्षमता
आज्ञापालन
खेलो इंडिया आर्चरी प्रशिक्षण केंद्र हा केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांपैकी एक असून,राज्यातील गुणवंत तिरंदाज घडविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. या प्रशिक्षणातून भविष्यात राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय तसेच २०२८ व २०३२ च्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी खेळाडू तयार होण्यास मदत होणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभागी व्हावे,असे आवाहन भास्कर घटाळे,जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!