Wednesday, September 23, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून भूजल पुनर्भरणालाही चालना मिळाली आहे. आगामी काळात संभाव्य अल निनो परिस्थितीमुळे कमी पर्जन्यमान किंवा पाणीटंचाईसारखी आव्हाने निर्माण झाल्यास त्यांचा परिणाम कमी करण्यासाठी ही जलसंधारणाची कामे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार १५ जलसंधारण कामे पूर्ण झाली असून त्यातून १८ हजार ७५० टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली आहे.तसेच प्रगतिपथावरील कामे पूर्ण झाल्यानंतर आणखी २ हजार ६० टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण होणार आहे.
पूर्ण झालेल्या कामांमध्ये १ हजार ३२९ बोडी खोलीकरण,७६७ फळबाग लागवड,१ हजार ६४ शेततळे,३२३ गॅबियन बंधारे,३८७ रिचार्ज शाफ्ट,२०७ कोल्हापुरी बंधारे तसेच वनक्षेत्रातील वनराई बंधारे, वनतळे आणि एलबीएससारख्या विविध मृद व जलसंधारण कामांचा समावेश आहे.यामुळे पावसाच्या पाण्याचे अधिकाधिक संधारण होऊन भूजल पातळी वाढण्यास मदत झाली आहे.
जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत ४ हजार ६३८ कामे पूर्ण झाली असून त्यातून ९ हजार ३४० टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली आहे.या योजनेत बोडी खोलीकरण,शेततळे,मजगी,गॅबियन बंधारे,वनराई बंधारे,रिचार्ज शाफ्ट,सिमेंट नाला बंधारे आणि तलाव दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना २.० अंतर्गत १ हजार ४२ कामे प्रस्तावित असून त्यापैकी मोठ्या प्रमाणावर शेततळे,मजगी,गॅबियन बंधारे,डीप सीसीटी आणि एलबीएसची कामे पूर्ण झाली आहेत.या कामांमधून ५ हजार २०० टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली आहे.
याशिवाय जिल्हा खनिज निधी,गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार,जिल्हा वार्षिक योजना आणि जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना यांमधूनही जलसंधारणाची महत्त्वपूर्ण कामे राबविण्यात आली आहेत.गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत लाखो घनमीटर गाळ उपसा करण्यात आला असून जलसाठा क्षमता वाढविण्यात यश आले आहे.जिल्हा वार्षिक योजनेतून ५ हजार ३१९ टीसीएम,तर आदिवासी उपयोजनेतील कामांमधून १ हजार ८१८ टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले की, “हवामानातील बदल आणि संभाव्य अल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसुरक्षा अधिक महत्त्वाची ठरत आहे. जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांमधून निर्माण झालेली जलसाठा क्षमता आणि भूजल पुनर्भरणाची व्यवस्था ही भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईचा परिणाम कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल.प्रलंबित जलसंधारण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून शेती,पिण्याचे पाणी आणि पर्यावरणीय संतुलन जपण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.”
जिल्ह्यात उभारण्यात आलेली ही व्यापक जलसंधारण यंत्रणा केवळ पावसाचे पाणी साठविण्यासाठीच नव्हे तर भूजल पातळी वाढविणे,सिंचनक्षमता मजबूत करणे आणि ग्रामीण भागातील पाणी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.त्यामुळे संभाव्य अल निनोच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्याची ही जलसंधारणातील गुंतवणूक भविष्यातील आव्हानांवर मात करण्यासाठी भक्कम आधार ठरणार असल्याचे दिसून येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!