- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यातील सन २०२५-२६ या वर्षातील खरीप हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली असून जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ०.७२ इतकी निश्चित करण्यात आली आहे. तहसीलदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे जिल्हा प्रशासनाने ही संकलित पैसेवारी जाहीर केली असल्याची माहिती गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली आहे.
जिल्ह्यात एकूण १ हजार ६८९ गावे असून त्यापैकी १ हजार ५५८ गावे खरीप पिकाखाली आहेत.याशिवाय, रब्बी पिकासाठी पात्र आणि खरीप पिकाच्या दोन-तृतीयांश क्षेत्राखाली येणारी ४ गावे या वर्गात गणल्या गेली आहेत.खरीप पिकाखाली असलेल्या गावांपैकी ५८ गावांत यावर्षी पिके झालेली नाहीत.खरीप पिकाखालील १ हजार ५०४ गावांमध्ये पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याचे नोंदले गेले असून ५० पैशांखाली पैसेवारी असलेले कोणतेही गाव नाही.विशेष म्हणजे,पैसेवारी ५० पैशांखाली असल्यास टंचाईसदृश्य परिस्थिती घोषित केली जाते.त्यानुसार लोकांना रोजगार पुरवावा लागतो.
- Advertisement -

