- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२५ साठी एकूण १२ शिक्षकांची निवड करण्यात आली असून या शिक्षकांचा गौरव सोहळा येत्या,गुरुवार ११ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवन येथे होणार आहे.
- निवड झालेले गुणवत्तावंत शिक्षक👇
गडचिरोली जिल्ह्याच्या १२ तालुक्यांतील १२ शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यामध्ये-
१.कु.वनश्री जाधव (वि.शि.,जि.प.शाळा गांगाव,ता. गडचिरोली)
२.कु.प्रीती नवघडे (प्रा.शि.,जि.प.शाळा कुनघाडा रै,ता. चामोर्शी)
३.कु.शितल कुमरे (वि.शि.,जि.प.शाळा बिहीटेकला,ता.कोरची)
४.श्री.बालाजी मुंडे (प्रा.शि.,जि.प.शाळा बदबदा,ता. कुरखेडा)
५.श्री.प्रवीण मुंजमकर (प्रा.शि.,जि.प.शाळा बोळधा,ता. देसाईगंज)
६.कु.हेमलता आखाडे (वि.शि.,जि.प.शाळा शिवणी बु., ता.आरमोरी)
७.कु.सिंपल मुधोळकर (वि.शि.,जि.प.शाळा डुम्मे, ता.एटापल्ली)
८.कु.उज्वला बोगामी (पद.शि., जि.प. शाळा आरेवाडा, ता.भामरागड)
९.श्री.मुरली गाइन(प्रा.शि., जि.प. शाळा विजयनगर, ता.मुलचेरा)
१०.कु.सुरेखा मेश्राम (प्रा.शि., जि.प.शाळा शिवणीपाठ, ता.अहेरी)
११.श्री.रमेश रच्चावार (पद.शि.,जि.प.शाळा नगरम,ता. सिरोंचा)
१२.श्री.विलास दरडे (प्रा.शि., जि.प.शाळा उदेगाव,ता. धानोरा)
- पुरस्कार समारंभ👇
११ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात निवड झालेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. शिक्षकांच्या गुणवत्तावर्धनाच्या कार्याची दखल घेत त्यांच्या योगदानाला गौरविण्याचा हा उपक्रम असून शिक्षण क्षेत्रातील कार्याला प्रेरणा मिळण्याचा हेतू यामागे आहे.नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (योजना)नितीन बच्छाव,शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे व शिक्षणाधिकारी(प्राथमिक)बाबासाहेब पवार यांनी केले आहे.
- Advertisement -

