Monday, March 17, 2025
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हास्तरीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रीत- १२ एप्रिल पर्यंत प्रस्ताव सादर करावे
spot_img

गडचिरोली जिल्हास्तरीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रीत- १२ एप्रिल पर्यंत प्रस्ताव सादर करावे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये जिल्ह्यातील युवांनी व संस्थांनी केलेल्या समाज हिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवांना विकासाचे कार्यकरण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार प्रती वर्षी देण्यात येत असतो.पुरस्कार जिल्ह्यातील एक युवक,एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येतो.मुल्यांकनासह व पात्रतेचे निकष पुर्ण करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील युवक,  युवती व संस्थांनी या कार्यालयातून अर्ज प्राप्त करुन घेऊन,आवश्यक कागदपत्र व शासन निर्णयानुसार पात्रतेच्या निकषाचे पुरावे व मुल्यांकनाच्या पुराव्याचे संपूर्ण कागदपत्रासह तसेच युवक-युवतीचे पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र व संस्थेसाठी प्रस्ताव सादर करणाऱ्यांनी सर्व सदस्यांचे पोलीस चारित्र्य  प्रमाणपत्रासह आपला परिपुर्ण प्रस्ताव १२ एप्रिल २०२३ पर्यंत दोन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जिल्हा क्रीडा संकुल गडचिरोली येथे सादर करावा.तसेच अधिक माहिती करीता शालेय शिक्षण व कीडा विभागाचा १२ नोव्हेंबर, २०१३ रोजीचा शासन निर्णयाचे अवलोकन करावे.अधिक माहिती करीता कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष कार्यालयात संपर्क साधावा असे प्रशांत दोंदल,जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.

युवक व युवतींसाठी पात्रतेचे निकष 👇

अर्जदार युवक,युवतीचे वय पुरस्कार वर्षातील १ एप्रिल रोजी १३ वर्ष पुर्ण व ३१ मार्च रोजी ३५ वर्षापर्यंत असावे (तसा पूरावा जोडावा).जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे त्या जिल्ह्यात सलग पाच वर्ष वास्तव्य असावे (दाखला जोडावा).पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागुन दिला जाणार नाही.पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात येणार नाही.केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडाणे आवश्यक राहील.उदा. वृत्तपत्रीय कात्रणे,प्रशस्तीपत्रे,चित्रफिती व फोटो, इत्यादी. अर्जदार युवक व युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रियाशिल कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील.अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेले असावे (तसे हमीपत्र जोडावे).एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. (तसे हमीपत्र जोडावे)केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय  व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही (तसे हमीपत्र जोडावे)अर्जदाराने पोलीस विभागाने प्रमाणीत केलेला चारित्र्य दाखला (संबंधीत परिक्षेत्रातील पोलीस स्टेशन) देणे आवश्यक राहील.

संस्थांसाठी पात्रता निकष 👇

 पुरस्कार संस्थेस विभागुन दिला जाणार नाही. संस्थांनी केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोणे आवश्यक राहील उदा.वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे,चित्रफिती व फोटो,इत्यादी.अर्जदार संस्थेने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रियाशिल कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील.अर्जदार संस्था सार्वजनिक विर्श्वस्त अधिनियम १८६० किंवा मुंबई पब्लीक ट्रस्ट ॲक्ट १९५० नुसार पंजीबद्ध असावी.अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्ष कार्यरत असणे आवश्यक आहे. अर्जदार संस्थेचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेले असावे. (तसेच हमीपत्र जोडावे)एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी संस्था राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही (तसे हमीपत्र जोडावे)अर्जदार व संस्थेच्या सदस्यांचा पोलीस विभागाने प्रमाणीत केलेला चारित्र्य दाखला (संबंधीत परिक्षेत्रातील पोलीस स्टेशन) देणे आवश्यक राहील.

पुरस्कारासाठी मुल्यांकन 👇

युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी केलेले कार्य १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत गत तीन वर्षाची केलेली कार्य कामगिरी विचारात घेण्यात येईल.युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य.राज्यात साधन संपत्ती जतन व संवर्धनत तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य.समाजातील दुर्बल घटक,अनुसुचित जाती,जमाती व जनजाती आदिवासी भाग इ.बाबतचे कार्य.शिक्षण,प्रौढशिक्षण, रोजगार,आरोग्य,पर्यावरण,सांस्कृतीक,कला,क्रीडा, मनोरंजन,विज्ञान तंत्रज्ञान,व्यवसाय,महिला सक्षमीकरण,स्त्रीभृन,व्यवनमुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य.राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य.नागरी गलीच्छवस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या,महिला सक्षमीकरण इ.बाबत कार्य, साहस इ.बाबतचे कार्य असावे.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बंद ग्रामपंचायतीचे कुलूप तोडून अज्ञाताने ग्रामपंचायतीची कागदपत्रे जाळली..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव ग्रामपंचायत येथील सुट्टीच्या दिवसांची संधी साधून अज्ञाताने बंद ग्रामपंचायतीचे कुलूप तोडून कार्यालयातील लोखंडी आलमारीतील महत्वाची कागदपत्रे पेट्रोल ओतून...

२२ वर्षीय तरुणीची राहत्या घरीच गळफास

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील चिचोली येथे एका २२ वर्षीय तरुणीने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रविवार सकाळच्या सुमारास उघडकीस...

दुचाकी स्लीप होऊन बसचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-पती-पत्नी आणि मुले घेऊन आपले स्वगावी दुचाकीने जात असतांना वाटेतच दुचाकी स्लीप होऊन समोरून येणाऱ्या बसचे चाक खाली कोसळलेल्या पत्नीच्या डोक्यावरून...

वाघाचे अवयव शिकार प्रकरणी धक्कादायक माहिती; सट्टापट्टीत आकडे सांगण्यासाठी वाघाच्या अवयवांचा वापर..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर प्रादेशिक वनविभागांतर्गत येणाऱ्या खापा वनपरिक्षेत्रात वाघाची शिकार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून अज्ञात शिकाऱ्यांनी वाघाचे चारही पंजे,मिशा आणि दात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!