उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- पंतप्रधान नॅशनल स्किम अंतर्गत येत्या सोमवारी ८ जुलै ला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे चंद्रपूर व नागपुर भागातील नामकिंत कंपनीद्वारे अप्रेंन्टिस आणि विशेष भरतीची सुवर्ण संधी उपलब्ध होत आहे.तरी जिल्ह्यातील ग्रामिण तथा शहरी भागातील सर्व व्यवसायातील आय.टी.आय.पास व सध्या शिकत असलेल्या तांत्रिक कौशल्य प्राप्त प्रशिक्षणार्थ्यांनी उपस्थित राहुन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा; असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था,गडचिरोली यांनी कळविले आहे.

