Monday, July 13, 2026
Homeनागपूरकौटुंबिक वादातून पोलिस शिपायाने राहत्या घरी  गळफास घेऊन केली आत्महत्या….

कौटुंबिक वादातून पोलिस शिपायाने राहत्या घरी  गळफास घेऊन केली आत्महत्या….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- कौटुंबिक वादातून हिंगणा पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस शिपायाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या  केली.ही घटना गिट्टीखदान पोलिस वसाहतीत काल,रविवारी सकाळी उघडकीस आली.दरम्यान आत्महत्या केलेल्या पोलिस शिपायाची पत्नीही कोराडी पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल असल्याची माहिती आहे.विजय चवरे वय ३८ वर्षे रा.पोलिस वसाहत,नागपूर असे आत्महत्या केलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे.गिट्टीखदान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मृत विजय चवरे हा  मूळचा चंद्रपूरचा रहिवासी आहे.मागील वर्षभरापासून तो हिंगणा पोलिस ठाण्यात कार्यरत होता.त्याची पत्नी रेणुका वय ३६ वर्षे ही कोराडी पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई आहे.

विजयला दारूचे व्यसन होते.दारू पिल्यानंतर तो नेहमीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून नेहमीच दोघांमध्ये खटके उडत असत. शनिवारी विजय कामावर गेला.तो दुपारी परत आला असता त्याला पत्नी घरी दिसली नाही.त्याने फोन करून विचारणा केली असता पत्नीने आपण खरेदीसाठी बाजारात आल्याचे सांगितले.त्यावर विजय संतप्त होऊन बाहेर निघून गेला.पत्नी रेणुका घरी परतली असता विजय घरी नव्हता.सायंकाळी रेणुका जेवण करून मुलगा व मुलीसोबत फिरण्यासाठी गेली सायंकाळी सात वाजता विजय घरी परतला.त्याने पत्नी रेणुकाला फोन करून घरी येण्यास सांगितले.परंतु तुम्ही नेहमीच दारू पिऊन भांडण करता,असे म्हणून तिने फोन ठेवला.परंतु राग शांत झाल्यावर रेणुका घरी परतली असता विजयने दार उघडले नाही.त्यामुळे रेणुकाने आपल्या मुलासह पार्किंगमध्ये असलेली कार क्रमांक- एमएच ३१, एफयू-८३१० मध्ये रात्र काढली.सकाळी उठल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!