Sunday, August 9, 2026
Homeधानोराकुरखेडा तालुक्यातून रानटी हत्तीच्या कळपाचे बस्तान धानोरा तालुक्यात…

कुरखेडा तालुक्यातून रानटी हत्तीच्या कळपाचे बस्तान धानोरा तालुक्यात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

धानोरा(गडचिरोली) :- गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्याच्या विविध भागांतील पिकांमध्ये धुडगूस घालून वनविभागासह शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणणाऱ्या रानटी हत्तींनी छत्तीसगड राज्याच्या दिशेने पंधरवड्यापूर्वी आगेकूच सुरू केली होती.हे हत्ती छत्तीसगड राज्यात जाणार; असे वाटत होते.परंतु,मुरूमगाव पश्चिम वनपरिक्षेत्रातील कवडीकसा, फुलकोडी आदी जंगल परिसरात हत्तींचा कळप पंधरवड्यापासून स्थिरावला आहे.

कुरखेडा तालुक्यातून रानटी हत्तींचा कळप धानोरा तालुक्यातील मुरूमगाव परिसरात दाखल झाला.त्यानंतर हत्तींच्या कळपाने पश्चिम मुरूमगाव वनपरिक्षेत्रातील जंगल परिसरात ठाण मांडले.या भागात घनदाट जंगल आहे.जंगलात चारा खाऊन कळप सध्या वावरत आहे.हत्तींचा वावर असलेल्या ठिकाणापासून छत्तीसगड राज्याची सीमा ३० ते ३५ किमी अंतरावर आहे.त्यामुळे हत्ती छत्तीसगड राज्यात दाखल होणार की नाही; हे सांगता येत नाही.मात्र, आतापर्यंत हत्तींनी शेतकऱ्यांच्या कोणत्याही पिकाची नासधूस केली नाही; असे मुरूमगाव (पश्चिम)च्या वनपरिक्षेत्र अधिकारी कराडे यांनी सांगितले.

हा भाग मुरूमगाव पूर्व व मुरूमगाव पश्चिम अशा दोन वन परिक्षेत्रांतर्गत येतो.त्यामुळे हत्तींच्या हालचालींवर दोन्ही वन परिक्षेत्राची नजर आहे.विशेष म्हणजे,हुल्ला टीमसह स्थानिक वन कर्मचारीसुद्धा कळपावर ड्रोन कॅमेरांद्वारे पाळत ठेवून आहेत.खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीची कामे जिल्ह्यात सध्या सुरू आहेत.या जंगलाला लागून असलेल्या शेतांमध्ये मशागत करताना रानटी हत्तींपासून धोका होण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

रेल्वेची जोरदार धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा वनपरिक्षेत्राच्या मूर्ती वनक्षेत्रातून गेलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावरील कक्ष क्रमांक-५९० मधील पोल क्रमांक १५२/२६ नजिक एका नर बिबट्याचा रेल्वेच्या...

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. डॉ.राघवेंद्र...

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!