Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीकडक उन्हाच्या उष्माघातापासुन खबरदारी घ्या..! - पहा लक्षणे व घ्यावयाची काळजी: दुर्लक्ष...

कडक उन्हाच्या उष्माघातापासुन खबरदारी घ्या..! – पहा लक्षणे व घ्यावयाची काळजी: दुर्लक्ष करू नका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासुन तापमानामध्ये सातत्याने वाढ होत आहे.या वाढत्या तापमानामुळे गंभीर दुष्परिणाम उद्भवु शकतात. त्यामुळे उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करु नये,उष्माघात टाळण्यासाठी दिलेल्या उपायांचा अवलंब करुन आवश्यक खबरदारी घ्यावी व सुरक्षित रहावे,असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.केवळ गडचिरोली जिल्ह्यातीलच नागरिकांनी खबरदारी घ्यावी,असे नाही तर संपूर्ण जिल्ह्यासह राज्यातील नागरिकांनी खबरदारी घेऊन सुरक्षितता बाळगावी.
 
 
उष्माघाताची सर्वसाधारण लक्षणे👇
१. जेष्ठ नागरिकांमध्ये मानसिक संवेदनशिलता, दिशाहीनता,संभ्रम,गोंधळ,चिडचिड,झटका येणे, थकवा जाणवणे.
२.गरम लाल कोरडी त्वचा,अत्याधिक तहान लागणे.
३.मुख्य शरीराचे तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा अधिक किंवा १०४ अंश फॅरनहांट.
३. तीव्र डोकेदुखी,चिंता,चक्कर येणे,बेशुध्द पडणे आणि अशक्तपणा जाणवणे।
४. मळमळ आणि उलटी होणे.
५. हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे,कसेतरी वाटणे.
 
मुलांमध्ये उष्माघाताची लक्षणे👇
१. भुक न लागणे,अत्याधिक चिडचिड होणे.
२. लघवी न होणे,डोळ्यासमोर अंधुकपणा जाणवणे.
३. सुस्ती येणे,मानसिक संभ्रम सारखी स्थिती.
४. झटका येणे,कोणत्याही ठिकाणाहून रक्त वाहणे.
सावध रहा व स्वतःची काळजी घ्या👇
 
१. एकटे राहणाऱ्या वृध्द किंवा आजारी लोकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवा.
२. शरीराला थंडावा देण्यासाठी पंखे आणि ओल्या कपड्यांचा वापर करा.
३. तुमच्या घराला थंड ठेवा,रात्री पडदे,शटर किंवा सनशेड वापरा आणि खिडक्या उघड्या ठेवा.
४. दिवसा खालच्या मजल्यावर राहण्याचा प्रयत्न करा.
आहारासंबंधी घ्यावयाची काळजी👇
१. अधिक प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.
२. दारु,चहा,कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये टाळा, कारण ते शरीराला हानी पोहचवू शकतात.
३. स्वयंपाक करायची जागा हवेशीर करण्यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा.
 
उन्हाळयात बाहेर फिरायला जातांना खालील गोष्टी लक्षात ठेवा👇
१. पिण्याचे पाणी/ज्युस सोबत ठेवा आणि हायड्रेटेड रहा.
२. पातळ,सैल सुती कपडे घाला.
३. सुर्यप्रकाशाचा थेट संपर्क टाळण्यासाठी छत्री/टोपी/टॉवेल आदींनी आपले डोके झाका.
अनवाणी बाहेर पडू नका👇
१. उष्णतेचा त्रास झालेल्या व्यक्तीची मदत करा.
२. संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी हलवावे.
३. शरीराच्या जास्तीत जास्त भागावार किंवा कपड्यांवर थंड पाण्याचा मारा करावा.
४. शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घाला, सावलीच्या ठिकाणी झोपवुन कपडे सैल करावीत.
५. तापमान कमी करण्यासाठी त्याला द्रव पदार्थ द्यावे व थंड पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात.
शरीराचे तापमान वाढलेले,बेशुध्द,गोंधळलेली, सतत घाम येणे,थांबलेली अशी व्यक्ती आपल्या नजरेस आल्यास १०८ किंवा १०२ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णास दाखल करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी केले आहे.तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!