Tuesday, September 22, 2026
Homeभामरागडकंत्राटदाराशी संगनमत करणे वनकर्मचाऱ्यांना भोवले…-गडचिरोली जिल्ह्यातील चार वनकर्मचारी निलंबित..

कंत्राटदाराशी संगनमत करणे वनकर्मचाऱ्यांना भोवले…-गडचिरोली जिल्ह्यातील चार वनकर्मचारी निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भामरागड(गडचिरोली) :- एटापल्ली तालुक्यातील नक्षलप्रभावित व अतिदुर्गम कसनसूर भागात रस्ता बांधणीच्या कामासाठी वनक्षेत्रातून बेसुमार मुरुम उपसा करण्यात आला.याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून चार वनकर्मचाऱ्यांना १० मे रोजी निलंबित करण्यात आले आहे.या कारवाईने भामरागड वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. कसनसूर वनपरिक्षेत्रातील झुरी नियतक्षेत्रात कार्यरत असलेले वनरक्षक एम.ए.निलेकार,नियतक्षेत्रातील वनरक्षक सोहगाव बी.डी.उसेंडी,वागेझरीचे क्षेत्र सहायक ए.आर.कुमरे व भापडाचे क्षेत्र सहायक डी.के.वासेकर यांचा निलंबित कर्मचाऱ्यांत समावेश आहे.

कसनसूर परिसरात सध्या नव्या रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.याकरिता वनपरिक्षेत्रातून बेसुमार मुरुम उपसा करण्यात आला.याकडे वनरक्षक व क्षेत्र सहायकांनी दुर्लक्ष केल्याची माहिती वरिष्ठांना मिळाली.त्यावरून भामरागडच्या सहायक वनसंरक्षकांनी चौकशी करून अहवाल भामरागडचे उपवनसंरक्षक शैलेश मीना यांना सादर केला.मीना यांनी चारही कर्मचाऱ्यांना प्राथमिक चौकशी अहवालाआधारे १० मेरोजी निलंबित केले आहे.

या सर्वांना निलंबन काळात मुख्यालयात हजेरी लावणे बंधनकारक आहे.या कारवाईने बेशिस्त कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.वनक्षेत्रातील मुरुमाचे नियमबाह्य उत्खनन केल्याप्रकरणी चार वनकर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले; पण कंत्राटदारावरील कारवाईबाबत कुठलीही पावले उचललेली दिसत नाहीत.त्यामुळे कंत्राटदाराला या प्रकरणातून सोयीस्कररीत्या ‘साईड कॉर्नर करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना...

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!