Saturday, June 27, 2026
Homeगडचिरोलीऑनलाईन हजेरीची अट ठरू लागली डोकेदुखी..-ग्राम रोजगार सेवक व मजूर त्रस्त; शासन...

ऑनलाईन हजेरीची अट ठरू लागली डोकेदुखी..-ग्राम रोजगार सेवक व मजूर त्रस्त; शासन सुस्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यात ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत अनेक कामे सुरू आहेत.कामावर मोठ्या प्रमाणात मजूर असून दररोज ग्रामरोजगार सेवकांना जिओ टॅग केलेल्या ठिकाणी मजुरांना बोलावून ऑनलाईन हजेरी घ्यावी लागते.हजेरी घेतल्यानंतर अपलोड करून सेव्ह करून पुन्हा दुपारच्या सत्रात ऑनलाईन हजेरी घेऊन ती सेव्ह करावी लागत असते. ही सर्व प्रक्रिया करताना ग्राम रोजगार सेवकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.तीव्र उन्हामुळे हजेरी घेण्यात येत असल्याने मजुर व रोजगार सेवक संताप व्यक्त करीत आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावात रोहयोतंर्गत विविध कामे सुरू आहेत.या कामाच्या माध्यमातून नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.परंतु, कामावर ऑनलाईन हजेरीची अट आता डोकेदुखीची ठरू लागली आहे.ग्रामरोजगार सेवकांना जिओ टॅग केलेल्या ठिकाणी मजुरांना बोलावून ऑनलाईन हजेरी घ्यावी लागते.हजेरी घेतल्यानंतर अपलोड करून सेव्ह करून पुन्हा दुपारच्या सत्रात ऑनलाईन हजेरी घेऊन ती सेव्ह करावी लागत असते.यामुळे भर उन्हात मजुरांची हजेरी घेणे भाग पडत आहे.काही वेळा अनेक ठिकाणी नेटवर्क मिळत नसल्याने हजेरी घेणे, अपलोड करणे याकरिता रखरखत्या उन्हात रोजगार सेवकांना व मजुरांना फोटो काढण्याकरिता उभे ठेवावे लागत आहे.त्यामुळे शासनाने या जाचक अटी बंद करून पूर्वीप्रमाणे ऑफलाईन हजेरीचा सुद्धा पर्याय ठेवण्यात यावा; अशी एकमुखी मागणी मजूर व ग्राम रोजगार सेवकांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर...

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!