उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळावा; या उद्देषाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम,२०१६ नुसार २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आणि निर्धारित वेळेत दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवून देण्याकरीता जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात तालुका स्तरावर १८ ठिकाणी दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहिम शिबिराचे आयोजन व नियोजन करून अंदाजे एकूण ९००० दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.त्यानुसार ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संकल्पनेतुन गडचिरोली जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींची जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील दिव्यांगत्व प्रमाणपत्र मंडळातील सर्व तज्ञ डॉक्टर्स यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद गडचिरोली व जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली आणि मिशन इंस्टिस्टयुट फार ट्रेनिंग रिसर्च एंड एक्शन (मित्र) यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगत्व प्रमाणपत्र प्राथमिक तपासणी व निदान विशेष मोहिम शिबिराचे आयोजन करण्यात आले.गट विकास अधिकार मुकेश माहोर, सहाय्यक गट विकास अधिकारी एस.पेंदाम,विस्तार अधिकारी (पंचायत) साईनाथ साळवे,तुषार पवार, सुभान शेख,तुळशीराम मडावी,मनीष मेश्राम,कोडापे, कृषि अधिकारी श्रीमती रामटेके,वैद्यकीय अधिक्षक डॉ.क्रांती राऊत,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन कन्नाके,वैद्यकीय अधिकारी डॉ.जास्मिना टेंभूर्ने, ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथील डॉ.गायत्री मराटकर, डॉ.तुपेश ऊईके,डॉ.प्रीती वर्मा,डॉ.श्रुती पटले आणि मित्र संस्थेचे अध्यक्ष अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वावलंबन या ऑन-लाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) देण्यासाठी विशेष प्राथमिक तपासणी व निदान मोहिम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर शिबिराच्या सर्व प्रवर्गातील एकूण २९१ दिव्यांग व्यक्तींची तज्ञ डॉक्टरांमार्फत दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता प्राथमिक तपासणी व निदान करण्यात आले.त्यापैकी अंदाजे २१० पात्र दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन या ऑन-लाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) आणि शासनाच्या विविध योजनांचे माहितीपत्रक स्पिड पोस्टने घरपोच देण्यात येणार आहे.दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता तपासणी व निदानासोबतच दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असलेल्या साहित्य-साधने व उपकरणाकरीता मोजमाप सुद्धा घेण्यात आले.लवकरच पात्र दिव्यांग लाभार्थ्याँना त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्य-उपकरणे देण्यात येईल.मागील १४ दिवसाच्या जिल्ह्यातील तालुकानिहाय शिबिरात एकूण ६४६० दिव्यांग व्यक्तींची दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता प्राथमिक तपासणी व निदान करण्यात आले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे,उप-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीश सोलंकी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील डॉ. इन्द्रजीत नगदेवते,डॉ.निखिल चव्हान,डॉ.सुनील भड, डॉ.मनोज मस्के,संदीप मोटघरे,डॉ.रोहन कुमरे,डॉ. परिक्षित चकोले,डॉ.बंडू नगराळे,अक्षय तिवाडे,नेहा कुमारे,उज्वल मोरे,प्रशांत खोब्रागडे,अजय खैरकर,अनुप्रिया आत्राम,उमेश कुळमेथे,तालुका आरोग्य विभाग,एटापल्ली,पंचायत समिती,एटापल्ली अंतर्गत सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी एटापल्ली,ग्रामपंचायत,सरपंच,ग्रामसेवक,आशा गट प्रवर्तक तथा गडचिरोली नर्सिंग कॉलेज येथील विद्यार्थी,समन्वयक समग्र शिक्षा अभियान तसेच मित्र संस्थेचे सचिव संजय पुसाम आणि प्रवीण राठोड, राकेश बिहाडे,गौरव देशमुख,चंदन गेडाम यांचे विशेष सहकार्य लाभले.