Friday, July 17, 2026
Homeगडचिरोली‘एकात्मिक बोडी आधारित शेती प्रकल्प’; नाबार्डकडून ३.२८ कोटींचा निधी मंजूर.. - ४७५...

‘एकात्मिक बोडी आधारित शेती प्रकल्प’; नाबार्डकडून ३.२८ कोटींचा निधी मंजूर.. – ४७५ आदिवासी कुटुंबांना होणार थेट लाभ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात शाश्वत उपजीविकेसाठी महत्त्वाकांक्षी ‘एकात्मिक बोडी आधारित शेती प्रकल्प’ प्रकल्प राबविण्यात येत आहे.या प्रकल्पासाठी ४.३५ कोटी रुपये मंजूर आराखड्यापैकी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड)कडून आदिवासी विकास निधी अंतर्गत ३.२८ कोटी रुपयांचा अनुदान निधी मंजूर करण्यात आला आहे.हा प्रकल्प धानोरा तालुक्यातील गोटा क्लस्टरमध्ये राबविण्यात येणार असून,१५ गावांतील एकूण ४७५ आदिवासी कुटुंबांना या उपक्रमाचा थेट लाभ होणार आहे.
प्रकल्पाची रूपरेषा👇
‘वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट’(WOTR)या संस्थेमार्फत प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.शाश्वत शेती पद्धती,पाणी व मृदसंधारण, बहुपीक शेती,बागायती विकास,पशुपालन,तसेच पूरक व्यवसायांद्वारे आदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढविण्याचा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
प्रकल्पाचा एकूण आर्थिक आराखडा सुमारे ४.३५ कोटी रुपये इतका असून,त्यामध्ये नाबार्डचे ३.२८ कोटी रुपये अनुदान,लाभार्थ्यांचा सुमारे ७२.८० लाखांचा सहभाग आणि इतर सुमारे ३४.५५ लाखांचे सहकार्याचा समावेश आहे.
आदिवासी विकासाला नवे बळ👇
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी भागातील शेती आणि उपजीविकेच्या संधी वाढविण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले असून,त्याच धोरणाचा भाग म्हणून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.दुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात शेती आधारित शाश्वत अर्थचक्र उभे करण्याचा राज्य शासनाचा निर्धार या माध्यमातून अधोरेखित झाला आहे.
अपेक्षित परिणाम👇
आदिवासी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न वाढ,शाश्वत व हवामान बदलास प्रतिरोधक शेती पद्धतींचा प्रसार, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन,महिलांचा व स्वयं सहाय्यता गटांचा सक्रिय सहभागी आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती.हा प्रकल्प केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून,दीर्घकालीन विकासाचा पाया मजबूत करणारा आहे.शासन,नाबार्ड आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून गडचिरोलीतील आदिवासी बांधवांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!