Saturday, June 13, 2026
Homeगडचिरोलीउमेदवारी अर्ज दाखल करतांना कार्यकर्त्यांच्या आनंदावर पडले विरजण... - उमेदवारांना शक्तिप्रदर्शनास मनाई..

उमेदवारी अर्ज दाखल करतांना कार्यकर्त्यांच्या आनंदावर पडले विरजण… – उमेदवारांना शक्तिप्रदर्शनास मनाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विधानसभा निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापू लागले आहे.निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणे हा एक मोठा सोहळाच असतो; परंतु आता अर्ज दाखल करताना उमेदवार व कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या उत्साहाला निवडणूक कार्यालय परिसरात निर्बंध येणार आहेत.त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात येताना उमेदवारांना शक्तिप्रदर्शन करता येणार नाही.या वेळी वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्यांचा समावेश नसावा.तसेच अर्ज दाखल करतांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या  दालनात पाच व्यक्तिंव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.त्याचबरोबर शक्तिप्रदर्शन करत मिरवणुका काढणे,सभा घेत घोषणा देणे,प्रचाराची गाणी,वाद्य वाजवण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे.
उमेदवारी अर्ज २२ ऑक्टोंबरला भरता येणार असून शेवटची तारीख मंगळवार दिनांक-२९ ऑक्टोंबर आहे. अनेकदा शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी भाऊगर्दी होते.यानिमित्त राजकीय पक्षांकडून शक्तिप्रदर्शन केले जाते.यामुळे कायदा सुव्यवस्था  बिघडत असते.निवडणूक प्रक्रिया शांततेत होण्यासाठी सर्व टाळण्यात येणार आहे.विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम १५ ऑक्टोंबर रोजी घोषित झाला आहे. निवडणुका घोषित होताच आदर्श आचारसंहिता अमलात आली आहे.त्यानुसार निवडणूक कालावधीत विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करताना कोणत्या नियमांचे पालन करावे,काय करू नये,परिसरात मिरवणुका,सभा घेण्यास प्रतिबंध असल्याचे आदेश लागू केले आहेत.निवडणूक अधिकारी कार्यालयात शांतता विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणुकीच्या वेळी अर्ज दाखल करणारे उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असतो.मोठमोठ्या मिरवणुका,असंख्य वाहनांचा ताफा व घोषणाबाजी करत निवडणूक अर्ज दाखल केले जातात; परंतु आता निवडणूक अधिकारी कार्यालय परिसरात एक प्रकारे संचारबंदीच लागू करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

हायवा ट्रकचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका अनियंत्रित हायवा ट्रकचा अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, गुरुवार ११ जून रोजी पहाटेच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!