Saturday, June 27, 2026
Homeगोंदियाउभ्या ट्रकला ट्रॅव्हल्सची धडक; एका प्रवासीचा जागीच मृत्यू तर दोघांचा वाटेत...

उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्सची धडक; एका प्रवासीचा जागीच मृत्यू तर दोघांचा वाटेत मृत्यू.. – आठ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या देवरी तालुका मुख्यालयापासून दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या धोबीसराड गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५३ वर गुरुवारच्या मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडल्याचे आज, शुक्रवार ५ डिसेंबरला उघडकीस आले आहे.राष्ट्रीय महामार्गावर एका उभ्या ट्रकला प्रवाशी ट्रॅव्हल्सने मागून जोरदार धडक दिल्याने धडकेत एका प्रवासी महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर दोन प्रवाशांना पुढील उपचारार्थ रुग्णालयात नेत असतांना  वाटेतच मृत्यू झाला आहे.अपघातात तब्बल ४० प्रवासी जखमी झाले असून ११ गंभीर जखमींना गोंदिया येथे दाखल करण्यात आले. त्यापैकी दोन रुग्णांना नागपूरला उपचारासाठी नेतांना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.तर आठ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.अपघातातील जखमी व मृत हे छत्तीसगडच्या कवर्धा,खैरागढ येथील ग्रामस्थ असून सर्व प्रवासी मजुरी कामासाठी चंद्रपूरकडे जात होते.सुनीता हेमलाल बघेले वय,३५ वर्ष रा.खैरागढ हिचा जागीच मृत्यू झाला.तर अन्य ४० जखमी प्रवाशांवर देवरी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
धोबीसराड गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर इंधन संपल्याने सीजी ०४ एनटी ५०९६ क्रमांकाचा ट्रक रस्त्याच्या बाजूला मार्गावरच बंद स्थितीत उभा होता. अश्यातच कवर्धा-छत्तीसगढ येथून चंद्रपूर- महाराष्ट्र येथे दररोज जाणारी कांकेर ट्रॅव्हल्स बस क्रमांक- सीजी १९ बीएल ८००१ हिने उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने धडकेच्या आवाजाने धोबीसराड गावातील नागरिक  घटनास्थळी मदतीला धावून गेले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले.यावेळी प्रामुख्याने देवरी येथील हेल्पिंग ग्रूपच्या सदस्यांनी जखमींना रुग्णालयात हलविण्यास मदत केली.जिल्ह्यातील सर्व १०८ रुग्णवाहिकांना बोलावून ११ गंभीर जखमी रुग्णांना गोंदिया येथे पुढील उपचारासाठी पाठविले. ट्रॅव्हल्समध्ये ५० च्या वर प्रवासी असल्याचे बोलले जात आहे.मध्यरात्रीपासून ते आज शुक्रवारी सकाळपर्यंत देवरी ग्रामीण रुग्णालयातील डॉ.अमित येडे व डॉ.नेहा मुलार यांनी ४० जखमींवर प्राथमिक उपचार केलेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

गडचिरोली शहरात मुला-मुलींचे प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित,दर्जेदार आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!