Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीउपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडक्या बहिणींशी साधला संवाद... - आज गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर..

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडक्या बहिणींशी साधला संवाद… – आज गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज,६ सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना अहेरी तालुक्यातील नागेपल्ली या गावात महिलांशी संवाद साधत त्यांनी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये मिळाले का? याबाबत आस्थेने विचारपूस केली आणि सदर पैसे हे महिलांनी त्यांच्या स्वतःसाठी वापरण्याच्या सूचना दिल्या.
अर्ज कधी भरला,आधार कार्ड आहे का? बँक खाते काढले का? योजनेबाबत तक्रार आहे का?आदी प्रश्न विचारून ज्या महिलांनी अद्याप पर्यंत अर्ज भरला नाही; त्यांनी लवकरात-लवकर अर्ज भरण्याचे  आवाहन अजित पवार यांनी केले.तसेच ज्या महिलांना अद्यापही पैसे मिळाले नाही; त्यांनी काळजी करू नये; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांना निश्चितच मिळेल याबाबत आश्वस्त केले.यावेळी एका मुकबधीर महिलेने आपल्या अडचणी मांडल्या असता उपमुख्यमंत्री पवार यांनी तातडीने तहसीलदार यांना बोलवून त्यांच्या अडचणी सोडवण्याचे निर्देश दिले.याप्रसंगी उपमुख्यमंत्री यांना महिलांनी राखी बांधून त्यांचे स्वागत केले.अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यावेळी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!