- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांची पाहणी करणार असून जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष आढावा बैठक घेणार आहेत.त्यानुसार,सकाळी ११.४५ ते १२.०० या वेळेत मौजे अडपल्ली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या परिसरास भेट देऊन कामांची प्रत्यक्ष पाहणी करतील. दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठ,मायनिंग कॉरिडॉर प्रकल्प आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक अंतर्गत सुरू असलेल्या कामांचे सादरीकरण व आढावा बैठक घेतील.दुपारी २.५० वाजता कोनसरी प्रकल्पाला भेट देऊन तेथील प्रगतीची पाहणी करतील.कोनसरी प्रकल्पानंतर चामोर्शी-हरणघाट रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून ते भंडारा जिल्ह्याकडे रवाना होतील.
- Advertisement -

