Thursday, January 22, 2026
Homeगडचिरोलीउद्याला गडचिरोली,अहेरी,आरमोरी,चामोर्शी, देसाईगंज,धानोरा,कुरखेडा व सिरोंचा येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन..

उद्याला गडचिरोली,अहेरी,आरमोरी,चामोर्शी, देसाईगंज,धानोरा,कुरखेडा व सिरोंचा येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये व विनायक रा.जोशी अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गडचिरोली यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीच्या वतीने उद्या,शनिवार १० मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा व सत्र न्यायालय गडचिरोली/अहेरी तसेच तालुका न्यायालय अहेरी,आरमोरी,चामोर्शी,देसाईगंज,धानोरा,कुरखेडा व सिरोंचा येथे आयोजित या लोकअदालतीमध्ये ४० वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र फौजदारी प्रकरणे,दिवाणी दावे तसेच दाखलपूर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत.या लोकअदालतीमध्ये १३८ एन.आय.ॲक्ट प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे,कौटुंबिक प्रकरणे,मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे,दरखास्त प्रकरणे,बँकेशी संबंधित प्रकरणे तसेच दाखलपूर्व वाद,मोबाईल/टेलिफोन कंपनी,वीज वितरण,पतसंस्था,नगर परिषद व ग्रामपंचायत कर आकारणीचे प्रकरणे समाविष्ट असणार आहेत. लोकन्यायालयात पारित झालेल्या अवॉर्डची न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे अंमलबजावणी करता येते.या प्रक्रियेमुळे लोकांचा वेळ,श्रम व पैशाची बचत होते.तसेच दोन्ही पक्षकारांमध्ये गोडवा निर्माण होत असते. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा,असे आवाहन आर.आर.पाटील सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर आरडी एजंटच्या हत्या प्रकरणातील आरोपी अटकेत.. – आरोपीस सात दिवसाची पोलीस कोठडी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील नागमंदिराजवळील जंगल परिसरात सोमवार १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आलेल्या आरडी एजंटच्या हत्या प्रकरणातील...

अधिकचे आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा खेळखंडोबा..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के पेक्षा अधिकचे ओबीसी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा खेळखंडोबा झाल्याचे...

थ्रेशर मशिनमध्ये तोल जाऊन वनरक्षकाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-थ्रेशर मशिनमध्ये तोल जाऊन एका ३० वर्षीय वनरक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार २१ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील मुरमाडी गावातील...

पिकअप वाहनाचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार तर १३ जखमी.. – आज सकाळच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील नांदगाव येथे आज,बुधवार २१ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडून अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला,तर १२ जणांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!