Monday, October 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने ‘खरीप हंगाम-२०२६’ साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज व इतर लाभासाठी सातबारा उताऱ्यावर ई-पीक पाहणीची नोंद असणे अनिवार्य आहे. मात्र,यंदाच्या नवीन पद्धतीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.पीक पाहणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांकडून १०० ते २०० रुपयांची बेकायदेशीर मागणी होत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.यापूर्वी शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून ई-पीक नोंदणी सहज करत होते.यंदा शासनाने प्रत्येक गावासाठी पीक पाहणी सहाय्यकांची नियुक्ती केल्याने त्यांनी शेतावर जाऊन नोंदणी करणे अपेक्षित आहे. शासनाकडून या कर्मचाऱ्यांना मानधन दिले जात असतांनाही,काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे मागितले जात आहेत.पैसे न दिल्यास पीक पाहणीस टाळाटाळ केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.तसेच,एकाच कर्मचाऱ्यावर संपूर्ण गावाची जबाबदारी असल्याने वेळेत पाहणी होणे कठीण झाले आहे.नियुक्त कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून पैसे मागू नयेत.कोणी पैसे मागत असल्यास शेतकऱ्यांनी तातडीने तहसील कार्यालयात संबंधिताची तक्रार करावी,असे आवाहन महसूल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सीईओचा कारवाईचा सपाटा; आता चातगावचा ग्रामसेवक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच काही दिवसांपूर्वी शासकिय निधीचे नुकसान करणे व इतर अनियमितता करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक...

पायाला चिखल माखल्याने धुण्यासाठी मोठ्या नहराजवळ गेले अन् विपरीत घडले; पती-पत्नीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेत पाहण्यासाठी शेतीवर गेले असता पायाला चिखल माखल्याने पाय धुण्यासाठी गोसेखुर्दच्या उजव्या कालव्याजवळ(मोठा नहर)गेले असता पत्नीचा पाय घसरला आणि ती पाण्यात...

अखेर ‘त्या’ तरुणाची ओळख पटली; रेल्वेने कटून शरीराचे झाले होते दोन तुकडे..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एका अज्ञात तरुणाचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी सकाळच्या सुमारास देसाईगंज शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या देसाईगंज-गोंदिया मार्गावरील तुकुम परिसरातील...

आणखी एका शेतकऱ्याने तलावात उडी घेत संपवले जीवन..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील धोप येथील ५३ वर्षीय शेतकरी राजेंद्र अमर सपाटे यांनी गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सकाळी विहिरीत उडी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!