- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट’ अभियाना अंतर्गत गडचिरोली जिल्हा शिवसेना महिला संपर्क प्रमुख वर्षाताई मोरे (कुंभारे)यांच्या वतीने काल,रविवार दिनांक-१५ सप्टेंबरला आरमोरी विधानसभा क्षेत्रातील गावोगावी भेटी देत मार्गदर्शनपर
लाडक्या बहिणींशी संवाद साधून कुटुंबातील महिला सदस्यांची आस्थेने विचारपूस करीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावीअंमलबजावणीसाठी प्रयत्न केलेत.
या प्रसंगी आरमोरी विधानसभा महिला जिल्हा प्रमुख अर्चना गोंदोळे,विधानसभा महिला प्रमुख छाया मानकर सह शिवसेना महिला पदाधिकारी तसेच आरमोरी विधानसभा संघटक नारायण धकाते,आरमोरी विधानसभा शिवसेना समन्वयक राकेश बैस,आरमोरी विधानसभा प्रमुख संतोष गोंदोळे,संजुभाऊ चट्टे विधानसभा मीडिया प्रमुख, विधानसभा उपजिल्हा प्रसिध्दी प्रमुख ऋषिकेश पारधी प्रामुख्याने उपस्थित होते.त्याचप्रमाणे कोरची तालुका प्रमुख नरडांगे व कोरची तालुका पदाधिकारी यांनी विषेश उपस्थिती दर्शविली होती.
आरमोरी शहरासह गावातील कुटुंबांना भेटी देऊन, कुटुंबातील महिलांची आस्थेने चौकशी करून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्षपणे होत आहे किंवा नाही आणि या योजनेचा लाभ,सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना मिळाला किंवा नाही यांची आरमोरी विधानसभा अंतर्गत,विविध गावातील आणि शहरातील,कुटुंबातील महिलांना भेटी देऊन वर्षाताई मोरे (कुंभारे) यांनी विचारपूस केली. यावेळी बहुसंख्य शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
- Advertisement -

