Friday, June 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त'आरटीओ चालान' च्या नावाने व्हॉट्सॲप ग्रुपवर आलेल्या 'एपीके' फाइलने घात केला.. -...

‘आरटीओ चालान’ च्या नावाने व्हॉट्सॲप ग्रुपवर आलेल्या ‘एपीके’ फाइलने घात केला.. – फाईल इन्स्टॉल करताच मोबाईल हॅक झाला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सायबर चोरटे इतके शातिर आणि हुशार असतात की,त्यांच्या जाळ्यात कुणी अडकला तर चुना लावल्या शिवाय राहत नाही.पूर्वी सायबर क्राईम करणारे चोरटे शासकीय योजनांच्या नावाने एखाद्याच्या व्हॉट्सॲपवर ‘एपीके’ फाइल्स पाठवायचे.मात्र,सध्या ‘आरटीओ चालान’ च्या नावाने एपीके फाइल पाठवून मोबाईल हॅक करण्याचा प्रकार समोर आला आहे.संभाजीनगरच्या छावणीतील एका मेडिकल व्यावसायिकाने आरटीओ चालान नावाची एपीके फाइल इन्स्टॉल करताच क्षणात  मोबाईल हॅक झाला आणि काहीच मिनिटांत मोबाईलमधून ९ लाख रुपये गायब झाले.प्रकरणी  छावणी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एपीके फाइल इंस्टॉल करताच सायबर गुन्हेगार तुमच्या मोबाइलचा ताबा मिळवतात.एपीके ॲपवर क्लिक करताच हिडन ॲप इंस्टॉल होऊन (मोबाइलमध्ये दिसत नाही) बॅकग्राउंडला सुरू करते.तुम्ही मोबाइलमध्ये जे काही करता,ते सायबर गुन्हेगारांना दिसते.बँक ॲप उघडताच ते त्याचाही ताबा मिळवतात.तुमचे सर्व मेसेज,कॉल एका विशिष्ट नंबरला ऑटो फॉरवर्ड होत असतात.त्यामुळे कोणतीही फोटो वा ॲप ऑटोमेटिक डाऊनलोड होऊ नये,यासाठी व्हॉट्सॲपचे ऑटो डाउनलोड मोड कायम बंद ठेवा.अनोळखी ॲप इंस्टॉल झाल्यास सर्वप्रथम मोबाईलचे फ्लाइट मोड ऑन करा.त्यानंतर डिव्हाइस फॅक्टरी रिसेट करा.फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० क्रमांकावर तक्रार नोंदवा.व्यावसायिक वसीमोद्दीन यांना ‘रिजास हेल्थ केअर’ या व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘आरटीओ चालान ५०० रुपये’ या नावाने मॅसेज आला होता.सदरचा मॅसेज एपीके फॉरमॅटमधील होता.वसीमोद्दीन यांनी त्यावर क्लिक करताच फोन हॅक झाला.त्यानंतर त्यांच्या फोनवर अनेक ओटीपी येण्यास सुरुवात झाली.त्यांना काहीतरी चुकीचे झाल्याची जाणीव होताच त्यांनी नेट बँकिंगच्या माध्यमातून बँक खाते गोठवण्याचा प्रयत्न केला. मात्र,तोपर्यंत उशीर झाला होता.सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या सर्व बँकेचे पासवर्ड बदलून २ लाख रुपये काढले.त्यानंतर काही मिनिटांत थेट ७ लाख रुपये काढले.इतकेच नव्हे तर सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या नावावर ३ लाख ४५ हजारांचे जंबो लोन घेतले.प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.एपीके (Apk)फाईल म्हणजे अँड्रॉइड पॅकेज किट.हे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे अप्लिकेशन्स इंस्टॉल करण्यासाठीची फाइल असते.प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअरवर खात्रीशीर ॲप्स असतात.मात्र,टेलिग्राम, व्हॉटसॲप ग्रुपवर आलेल्या अशा एपीके (Apk) फॉरमॅटमधील फाइल्स धोकादायक असतात.त्यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे; अन्यथा मेहनतीने गोळा केलेली जमा पुंजी क्षणात गमावून बसण्याची वेळ कुणावर येऊ नये.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात केले स्वागत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "मोठी स्वप्ने पाहा,शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा," असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली...

डीआरआयची मोठी कारवाई; वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात बेकायदेशीर वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...

घरून निघाला ‘तो’ परतलाच नाही; ५९ वर्षीय इसम दहा दिवसांपासून बेपत्ता..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या श्रीनगर वार्डातील केस कटिंगचा (न्हावी)व्यवसाय करणारा ५९ वर्षीय इसम घरून दुकानात जाण्यासाठी निघाला तो अद्यापही घरी परतला नसल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!