- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजून आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.यावेळेस बाजी कोण मारणार,हे सांगता येत नाही.यावेळेस गडचिरोली जिल्ह्याच्या तीनही विधानसभा क्षेत्रातील चित्र बदलणार असल्याचे सर्वत्र सुर उमटू लागले आहे.राज्यातील भाजपा व काही पक्ष सोडले तर अनेक पक्षांचे उमेदवार अद्यापही जाहीर करण्यात आले नसल्याचे दिसून येते.जो-तो मलाच उमेदवारी मिळावी; यासाठी प्रयत्न करीत आहेत.अशातच “आम्ही जनतेसाठी उभे राहू; खुर्चीसाठी नाही” असे म्हणीत सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ अंतर्गत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी ६९-अहेरी (अनुसूचित जमाती) या विधानसभा मतदारसंघात एक अर्ज दाखल करण्यात आला आहे.दिपक मल्लाजी आत्राम (अपक्ष) यांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले.६७-आरमोरी (अ.ज.)व ६८-गडचिरोली (अ.ज.) या दोन विधानसभा मतदारसंघात एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेले नाही.
आज,मंगळवारी २२ ऑक्टोंबर रोजी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून ५ व्यक्तींनी २० नामनिर्देशन अर्जाची उचल केली तर गडचिरोली विधानसभा मतदार संघातून ९ व्यक्तींनी २५ अर्जाची आणि अहेरी मतदारसंघातून ११ व्यक्तींकडून १२ अर्जाची उचल करण्यात आली आहे.विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत २९ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत आहे.
- Advertisement -

