उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- गेली दहा दिवसांपासून देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागा अंतर्गत पूर्वी झालेल्या व हल्ली सुरू असलेल्या वृक्ष लागवडीच्या रोपवन साईटवर मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्या प्रकरणी सत्यवान रामटेके गडचिरोली मुख्य वनसंरक्षक (प्रादे.)वनवृत्त कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.मात्र त्यांच्या आमरण उपोषणाची दखल अजून पावेतो घेण्यात आली नसल्याने आमरण उपोषण कर्त्याच्या जीवावर अधिकारी उठलाय की काय? अशी शंका निर्माण झाली आहे.अशातच एक दिवस साहेबगिरी निघणार असल्याचे सर्वत्र सुरू निघू लागले आहेत.
कुठल्याही कार्यालयातील कितीही मोठा अधिकारी वा कर्मचारी तरीही असा व्यक्ती साहेब नसतो.मात्र हल्ली नुकताच काही महिन्यांपूर्वी आलेला अधिकारी स्वतःला मोठा साहेब समजून तोऱ्यात वावरत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.आता त्याला कोण सांगणार की ‘अरे तु साहेब नाहीस’…. ‘तु तर लोकसेवक’..आहेस व जिथ पर्यंत आहेस तिथ पर्यंत लोक सेवकच राहणार आहेस.कार्यकाळ संपला की कुणीही ढुंकून पाहणार नाही.सुरुवातीला हे साहेबगिरी दाखवीत नाहीत.सुरळीतरित्या कामे पार पाडण्यात मग्न असतात.मात्र जस-जशी यांना पैश्याची चटक लागत जाते तस-तशे हे साहेबगीरी दाखवू लागतात. व तोऱ्यात वावरू लागतात.यांना सर्वसामान्य नागरिकांशी कसलेही देणे-घेणे नसते.फक्त मिळकत कुठून येणार याची नेहमीच वाट बघत असतात. गैरव्यवहार व भ्रष्टाचार करण्यात रमून जातात.एखादे प्रकरण उघडकीस येताच ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका बजावून हात वर करीत असतात.खाऊनही न खाल्ल्याचे भासवित असतात.वरून दिमाखदार गोष्टी करून उडवा-उडविची उत्तरे देऊन ‘सुमळी मध्ये कोंबडी’ खात असल्याने यांची साहेबगीरी एक दिवस निघणारच; त्यामुळे ‘जरा सांभाळून पुढचे पाऊल जरा जपून’ असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.