Tuesday, July 21, 2026
Homeगडचिरोलीआपसी तडजोडीने ४०० प्रकरणे निकाली; दीड कोटींहून अधिकची वसुली..

आपसी तडजोडीने ४०० प्रकरणे निकाली; दीड कोटींहून अधिकची वसुली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,नवी दिल्ली यांचे आदेश व उच्च न्यायालय,मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये वर्षातील चौथी व शेवटची राष्ट्रीय लोकअदालत यशस्वीपणे पार पडली.
या लोकअदालतीमध्ये तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी स्वरूपाची प्रकरणे,धनादेश नापसंतीबाबत एन.आय.ॲक्ट अंतर्गत कलम १३८ अन्वयेची प्रकरणे, भू-संपादन प्रकरणे,कौटुंबिक वाद,मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे,दरखास्त प्रकरणे तसेच दाखलपूर्व वादांचा समावेश करण्यात आला होता. याशिवाय महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची थकीत वीजबिल प्रकरणे, पतसंस्था व बँकांची थकीत कर्ज प्रकरणे,फायनान्स कंपन्यांची कर्ज वसूली प्रकरणे,ग्राहक न्यायालयातील दावे तसेच मोटार वाहन कायद्यान्वये चालान प्रकरणे लोकअदालतीसमोर ठेवण्यात आली होती.
संपूर्ण जिल्ह्यात एकूण १० पॅनल स्थापन करण्यात आले होते.या पॅनलसमोर एकूण ३३२ प्रलंबित खटले व ६८ दाखलपूर्व वाद प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली.लोकअदालतीच्या माध्यमातून एकूण १ कोटी ५९ लाख ६६ हजार ५०७ रुपये इतकी रक्कम वसूल झाली.निकाली निघालेल्या एकूण प्रकरणांपैकी २७० प्रकरणे गुन्हा कबुलीच्या माध्यमातून निकाली काढण्यात आली.
जिल्हा न्यायालय गडचिरोली येथील पॅनल क्रमांक २ समोर आपसी समझोत्यासाठी आलेल्या एका वैवाहिक वादाच्या प्रकरणात पती-पत्नी यांच्यात समझोता होऊन पत्नी पुन्हा संसारासाठी नांदायला गेल्याने विनायक रा.जोशी,अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली यांनी उभयतांचा सत्कार करून लोकअदालतीच्या सामाजिक महत्त्वावर प्रकाश टाकला.
संपूर्ण लोकअदालतीचे आयोजन विनायक रा.जोशी, अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,गडचिरोली आणि अंकुश पुंडलिकराव खानोरकर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यांच्या देखरेखीखाली करण्यात आले.
जिल्हा न्यायालय गडचिरोली येथे पॅनल क्रमांक १ वर  व्ही.एस.खोत,तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश गडचिरोली पॅनल क्रमांक २ वर एस.पी.सदाफळे दिवाणी न्यायाधीश,वरिष्ठ स्तर, गडचिरोली आणि पॅनल क्रमांक ३ वर एस.बी. विजयकर,मुख्य न्यायदंडाधिकारी गडचिरोली यांनी कामकाज पाहिले.गुन्हा कबुलीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालय कार्यरत ठेवण्यात आले होते.या विशेष न्यायालयात  एस.ए.भैसारे,सहदिवाणी न्यायाधीश तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी,कनिष्ठ स्तर चामोर्शी यांनी काम पाहिले.पॅनल क्रमांक १ मध्ये श्रीमती रिंकी मनोहर भगत, विधी स्वयंसेविका,पॅनल क्रमांक २ मध्ये नरेंद्र ढिवरू मोटघरे विधी स्वयंसेवक तसेच पॅनल क्रमांक ३ मध्ये  प्रवीण श्रीराम घाटे,विधी स्वयंसेवक यांनी पॅनल सदस्य म्हणून योगदान दिले.
सदर राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. किशोर आखाडे,जेष्ठ अधिवक्ता वृंद,समस्त अधिवक्ता, न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली येथील कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य व परिश्रम घेतले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!