उद्रेक न्युज वृत्त
तिरुवनंतपूरम : –केरळच्या कोझिकोड येथील एक ट्रान्सजेंडर जोडपे आई-बाबा होणार आहे.गत तीन वर्षांपासून जहाद आणि जिया एकमेकांसोबत राहात आहेत.दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, मार्चमध्ये आमच्या कुटुंबात एक नवा पाहुणा येणार आहे, अशी बातमी जगाला दिली आहे. जहाद हा प्रेग्नंट असल्याचे स्पष्ट दिसते आहे.पुरुष ट्रान्सजेंडर एका बाळाला जन्म देणार असल्याचे देशात पहिल्यांदाच घडते आहे; हे विशेष !
जिया ही एड डान्सर आहे.जिया आधी पुरुष होता. लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करून तो स्त्री बनला. जहाद हा स्त्री होता आणि शस्त्रक्रिया करून ती पुरुष बनली. प्रेग्नंट होता यावे म्हणून जहादने एका महिलेपासून पुरुष बनण्याची प्रक्रिया खंडित केली. बाळाला जन्म दिल्यानंतर जहाद पूर्ववत पुरुष बनण्याची प्रक्रिया सुरूकरणार आहे.
जिया म्हणते आई होण्याचे माझे स्वप्न आणि वडील होण्याचे माझ्या जोडीदाराचे स्वप्न आमचे बाळ पूर्ण करणार आहे.जहादला आठवा महिना आहे.जन्माने मी स्त्री नव्हते, पण मला कुणीतरी आई म्हणावे,हे स्वप्न मी सतत पाहात आले आहे.आम्ही सोबत राहू लागलो तसे हे स्वप्न आकार घेऊ लागले. मग जहादने त्याच्यावर सुरू असलेली ब्रेस्ट रिमूव्हल सर्जरीची प्रक्रिया खास गर्भावस्थेकरिता थांबविली. बाळाला जन्म दिल्यानंतर जहाद पुरुष बनण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करेल.