Monday, May 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआधीच महागाईच्या झळा; त्यात वाहनधारकांना शुल्क वाढीचा झटका..!

आधीच महागाईच्या झळा; त्यात वाहनधारकांना शुल्क वाढीचा झटका..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महागाईने कुणी वैतागले नसले तरीही याची झळ रोजची रोजी-रोटी कमावून खाणाऱ्यांना जाणवत असते.आजच्या घडीला अनेकांकडे वाहने आहेत.काहीजण कर्ज काढून वाहने खरेदी करतात,तर काहीजण आपली ऐपत पाहून पाय पसरतांना दिसून येतात.अश्यातच आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्य वाहनधारकांना  गृह(परिवहन)विभागाने मोठा झटका दिला आहे.ड्रायव्हिंग लायसन्स(अनुज्ञप्ती) आणि आरसी बुक(नोंदणी प्रमाणपत्र)घरपोच मिळवण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या पोस्टल शुल्कात शासनाने मोठी वाढ केली आहे.आता नागरिकांना ५८ रुपयांऐवजी ७० रुपये मोजावे लागणार आहेत.त्यामुळे परमानंट(कायम)ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ७७० रुपये, रिनिव्हल लायसन्ससाठी ४७० रुपये,तर टू व्हिलर व फोर व्हिलर एकत्र असलेल्या लायसन्ससाठी १ हजार ७० रुपये द्यावे लागणार आहेत.परिवहन विभागामार्फत नागरिकांना परवाना आणि नोंदणी प्रमाणपत्र पोस्टाने घरपोच पाठवले जाते.यासाठी परिवहन आयुक्त कार्यालय आणि पोस्ट विभाग यांच्यात दरवर्षी करार होतो.यापूर्वी स्थानिक आणि बिगर स्थानिक अशा दोन्ही पत्त्यांसाठी ५८ रुपये(१८ टक्के जीएसटीसह)एकसमान शुल्क आकारले जात होते.मात्र,पोस्ट विभागाने आता हे शुल्क वाढवून ७० रुपये करण्याचा प्रस्ताव दिला होता, ज्याला शासनाने मंजुरी दिली आहे.याची अंमलबजावणी १ ऑक्टोंबर २०२५ पासून करण्यात आली असली तरी १ जानेवारी २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय काढण्यात आला आहे.परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे वाहनधारकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आधीच लायसन्स आणि रजिस्ट्रेशनसाठी मोठी फी घेतली जाते,त्यात आता घरपोच दरवाढ करणे चुकीचे आहे,अशा प्रतिक्रिया सामान्य नागरिकांच्या आहेत.विशेष म्हणजे,ज्यांच्या डिलिव्हरीच्या नावाखाली पुन्हा घरचा पत्ता आरटीओ कार्यालयाच्या जवळ आहे,त्यांनाही आता लांबच्या पत्त्याप्रमाणेच वाढीव ७० रुपये द्यावे लागणार आहेत.
दर शुल्क👇
पोस्टाचे जुने शुल्कः ५८ रुपये (जीएसटीसह)
पोस्टाचे नवीन शुल्कः ७० रुपये (जीएसटीसह)
वाढीचा फरकः प्रतिकार्ड १२ रुपयांची वाढ.
जुने ड्रायव्हिंग लायसन्स शुल्कः ७५८ रुपये
नवे ड्रायव्हिंग लायसन्स शुल्क : ७७० रुपये
जुने रिनिव्हल ड्रायव्हिंग लायसन्स शुल्क : ४५८ रुपये
नवीन रिनिव्हल ड्रायव्हिंग लायसन्स शुल्क : ४७० रुपये
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!