Monday, August 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मिळणार दोन हजार रुपये..

आता शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मिळणार दोन हजार रुपये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या दोन हजाराच्या आर्थिक लाभानंतर महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी असून आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये थेट शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहेत.नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता हा पुढील आठवड्यात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.या हप्त्यासाठी १ हजार ७७४ कोटी निधी वितरीत करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली असून राज्यातील सुमारे ९० लाख ३४ हजार पात्र शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे.या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देऊन शेतीचा वाढता खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा मुख्य उद्देश आहे.केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पात्र शेतकरी कुटुंबांना दिला जाणारा २२ वा हप्ता शुक्रवार,१३ मार्च २०२६ रोजी वितरित करण्यात आला होता.अश्यातच आता महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना पुढील आठवड्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये खात्यात जमा होणार असल्याने हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!