Monday, July 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता रेती तस्करांची खैर नाही..! अवैध उत्खनन,वापर व वाहतूक प्रकरणी रेती तस्करांवर...

आता रेती तस्करांची खैर नाही..! अवैध उत्खनन,वापर व वाहतूक प्रकरणी रेती तस्करांवर होणार फौजदारी कारवाई.. – शासन परिपत्रक जारी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पूर्वी अवैध रेती उत्खनन व वाहतूक प्रकरणी महसुलचे उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयाकडून शास्तीची कारवाई म्हणून केवळ रक्कम भरून दंड वसूल केले जायचे आणि अवैध रेती वाहतुकीची साधने सोडून दिली जात होती.त्यामुळे बऱ्याच कालावधीपासून राज्यात मोठ्या प्रमाणात रेती व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन,वापर,वाहतुक व तस्करीचे वारंवार प्रकार घडत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले.अश्या प्रकारांमुळे शासनाच्या महसुलाची तसेच पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात होत आहे.वाळू(रेती) व इतर गौण खनिजाचे अनधिकृत उत्खनन,वापर व वाहतूक तसेच तस्करी यामुळे गुन्हेगारी कारवाया वाढत आहेत.यामुळे वाळू व इतर गौण खनिजांचे नियमन करणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या जिवितास धोका निर्माण होऊन  सार्वजनिक सुव्यवस्थेत देखील बाधा येत आहे.वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन,वापर व वाहतूक रोखण्यासाठी अशा व्यक्तींवर जबर कारवाई करणे आवश्यक असल्याने,अशा व्यक्तींविरोधात विविध कायदे,अधिनियम,नियम याअन्वये फौजदारी कारवाई करण्याकरीता शासनाने मोठे पाऊल उचलत आता अवैध उत्खनन,वापर व वाहतूक प्रकरणी रेती तस्करांवर विविध कलमान्वये फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत नुकतेच आठ दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या वतीने शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
  • केवळ दंडात्मक कारवाई न करता संबंधितांविरुध्द फौजदारी कारवाई👇
वाळू व इतर गौण खनिजाची अवैध,अनधिकृत उत्खनन,वापर,वाहतूक व तस्करीमध्ये आढळून आलेल्या व्यक्ती यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील तरतुदीनुसार केवळ दंडात्मक कारवाई न करता संबंधितांविरुध्द फौजदारी कारवाई म्हणजेच एफ.आय.आर दाखल करण्याची कार्यवाही महसूल विभागाच्या संबंधित अधिकारी,कर्मचाऱ्यांनीच करावी.अशा व्यक्तींविरुध्द फौजदारी गुन्हे दाखल करतांना महाराष्ट्र जमीन महसुल संहिता,१९६६- (उदा.कलम ४८ (७) व ४८ (८)),भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.),२०२३-(उदा.कलम ३०३(२),३१०(२),१३२,३५१(२),११८(१), ११५(२), ३३२(C),३(५),पर्यावरण संरक्षण अधिनियम,१९६६-(उदा.कलम ९ व १५),खाण आणि खनिज अधिनियम,१९५८- (उदा.कलम ३,४ व २१),सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम-(उदा.३ व ७) यामधील विविध कलमाच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही पोलीस अधिकारी,महसुल अधिकारी,कर्मचारी व संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी करावी,असे परिपत्रकात म्हटले आहे.
  • स्थानबध्दतेची कार्यवाही👇
वाळू व इतर गौण खनिजांचे अवैध उत्खनन वापर, वाहतूक व तस्करी यापासून परावृत्त करण्यासाठी, पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र झोपडपटटी गुंड,हातभट्टीवाले,औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार,कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती,धोकादायक व्यक्ती,अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे व्यक्ती आणि वाळू तस्कर यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणेबाबत अधिनियम १९८१ अन्वये स्थानबध्दतेच्या अनुषंगाने ग्रामीण क्षेत्रात संबंधित जिल्हाधिकारी व शहरी क्षेत्रात संबंधित पोलीस आयुक्त  स्थानबध्दतेची कार्यवाही करतील.
  • “वाळू तस्कर” संज्ञेचा समावेश👇
वाळूच्या अवैध उत्खनन व वाहतूकीस आळा घालण्यासाठी “महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड,हातभट्टीवाले, औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार,धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती(व्हिडीओ पायरेटस) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम,१९८१ मध्ये महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५/२०१६ अन्वये सुधारणा करण्यात आली असून,आता सदर अधिनियमात “वाळू तस्कर” या संज्ञेचा समावेश करण्यात आला आहे.
  • गुन्ह्याची सिध्दता होण्यासाठी एकमेकांना सहकार्य👇

यापूर्वी वाळूचे अवैध उत्खनन वा वाहतूक केल्याबद्दल गुन्हा नोंदविलेल्या इसमाकडून पुन्हा तोच गुन्हा घडल्यास अशा इसमाविरुध्द सदर अधिनियमातील तरतूदीनुसार पोलीसांच्या मदतीने प्रतिबंधात्मक स्थानबध्दतेची कारवाई करण्यात येणार आहे.गुन्हे दाखल झाल्यानंतर गुन्हयाच्या तपासाच्या दृष्टीने महसूल यंत्रणा,पोलीस यंत्रणा व संबधित सक्षम अधिकाऱ्यांनी दाखल गुन्हयात आरोपींविरुध्द गुन्हयाची सिध्दता होण्यासाठी एकमेकांना योग्य ते सहकार्य करावे.याबाबत जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,पोलीस आयुक्त व संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रीय कार्यालयास योग्य त्या सूचना देण्याची कार्यवाही करण्याबत म्हटले आहे.

  • कर्तव्यात कसूर केल्यास कारवाई👇
गौण खनिजांचे अवैध उत्खनन,वापर,वाहतूक व तस्करी करणाऱ्या व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यास अथवा दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने तपासात पोलीस,महसूल यंत्रणेमधील तसेच संबंधित सक्षम यंत्रणेच्या अधिकारी,कर्मचारी यांनी हयगय,कसुरी केल्याचे निर्दशनास आल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याविरूध्द संबंधित जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,पोलीस आयुक्त कारवाई करणार असल्याने आता रेती तस्करी करणाऱ्यांची खैर नाही,अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!