Wednesday, August 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता राष्ट्रीय गीत असलेल्या 'वंदे मातरम्'ला कायदेशीर संरक्षण प्राप्त.. -कोणत्याही शासकीय कार्यक्रमात...

आता राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’ला कायदेशीर संरक्षण प्राप्त.. -कोणत्याही शासकीय कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ प्रथम गायले जाईल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल मंगळवारी ‘राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण (सुधारणा)विधेयक २०२६’ ला मंजुरी दिल्याने आता राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीत ‘जन-गण-मन’प्रमाणेच समान कायदेशीर संरक्षण प्राप्त झाले आहे. संसदेने मागील महिन्यात ‘राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण कायदा,१९७१’ मध्ये सुधारणा करणारे महत्त्वपूर्ण विधेयक बहुमताने मंजूर केले होते.राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर आता या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले असून संपूर्ण देशात हा नियम लागू झाला आहे. महत्वाचे म्हणजे,पूर्वी १९७१ च्या मूळ कायद्यात केवळ राष्ट्रगीत ‘जन-गण-मन’च्या अवमानाबाबतच शिक्षेची तरतूद होती. ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा असूनही असा कोणताही थेट कायदेशीर आधार नसल्याने केंद्र सरकारने कलम ३ मध्ये सुधारणा करून ‘वंदे मातरम्’चाही यामध्ये समावेश केला आहे.त्यानुसार, आता राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. ‘वंदे मातरम्’चे गायन रोखणे किंवा गायन चालू असतांना त्यात अडथळा निर्माण करणे हा गंभीर गुन्हा मानला जाईल.असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षांपर्यंतचा कारावास,दंड,किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.जर एखाद्या व्यक्तीने वारंवार गुन्हा केला,तर प्रत्येक नव्या गुन्ह्यासाठी त्याला एका वर्षाच्या अतिरिक्त तुरुंगवासाची शिक्षा दिली जाईल.अधिकृत कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ची सर्व सहा कडवी गायली जातील.यासाठी तीन मिनिटे दहा सेकंदांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. कोणत्याही शासकीय कार्यक्रमात राष्ट्रगीत(जन-गण-मन) आणि राष्ट्रीय गीत एकत्र वाजवले किंवा गायले जाणार असल्यास, ‘वंदे मातरम्’ प्रथम गायले जाईल.राष्ट्रीय गीत सुरू असतांना उपस्थितांना सावध स्थितीत उभे राहणे बंधनकारक असेल.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत पिकांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला.. – कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्याने सांगितला आनंददायक अनुभव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)योजनेअंतर्गत मी ३० पाईपची मागणी केली होती.पाईप खरेदी केल्यानंतर अवघ्या ८ दिवसांच्या आत माझ्या खात्यात ८०...

कारची ट्रकला मागून जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज,बुधवार १२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला; तर...

सर्पदंश दुर्घटनेनंतर प्रशासनाची कठोर कारवाई; मुख्याध्यापक व दोन वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल.. – आश्रमशाळा बंद करण्याची शासनाकडे शिफारस..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची जिल्हा प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाने गंभीर...

२० हजाराची लाच घेतांना वनक्षेत्र सहाय्यक अडकला एसीबीच्या जाळ्यात; तर उपस्थित दोन वनरक्षकही ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्राच्या राजुली सहवन क्षेत्रांतर्गत येणाऱ्या परसटोला येथील राउंड ऑफिसमध्ये गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)पथकाने २० हजाराची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!