Thursday, July 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता न्यायालयातील न्यायदेवतेच्या हातात तलवार ऐवजी संविधान...

आता न्यायालयातील न्यायदेवतेच्या हातात तलवार ऐवजी संविधान…

- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आता भारतातील न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवण्यात आली आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी यासंदर्भातील बदलांसाठी पुढाकार घेतला होता.आता त्यांच्या आदेशानुसार न्यायदेवतेच्या मूर्तीत बदल करण्यात आले आहेत.सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या ग्रंथालयासमोर न्यायदेवतेची नवी मूर्ती लावण्यात आली आहे.
आधीच्या मूर्तीवर डोळ्यांवर काळी पट्टी लावलेली असायची आणि एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात शिक्षा देण्यासाठी तलवार असायची.आता नव्या मूर्तीच्या डोळ्यावरील पट्टी हटवली गेली आहे. तसेच हातात तलवारच्या ऐवजी संविधानाची प्रत दिसते. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यामते आता आपल्याला ब्रिटिशांच्या परंपरा आणि वारशाच्या पुढे गेले पाहिजे. कायदा कधीच अंध असू शकत नाही.तो सर्वांना समान पद्धतीने पाहतो.यामुळेच सरन्यायाधीश न्यायदेवतेच्या मूर्तीत बदल केला जाण्याची गरज असल्याचे म्हटले होते.त्याच बरोबर देवीच्या एका हातात तलवारच्या जागी संविधान पाहिजे.ज्यामुळे समाजात संदेश जाईल की,देवी संविधानानुसार न्याय करते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
सरन्यायाधीशांच्या मते तलवार हिंसेचे प्रतीक आहे. न्यायालयात हिंसा नाही तर संविधानाच्या कायद्यानुसार न्याय होतो.दुसऱ्या हातात असलेला तराजू योग्य आहे जो सर्वांना समान पद्धतीने न्याय देते.माहितीनुसार सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिलेल्या आदेशानंतर न्यायदेवतेची नवी मूर्ती तयार करण्यात आली.अशी पहिली मूर्ती न्यायधीशांच्या ग्रंथालयाबाहेर लावण्यात आली.ज्या मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी नाही आणि हातात तलवार ऐवजी संविधान आहे.
न्यायदेवतेची मूळ मूर्ती यूनानमधील प्राचीन देवी असल्याचे सांगितले जाते.तिला न्यायाचे प्रतीक म्हटले जाते.या देवीचे नाव जस्टिया असून त्यातूनच जस्टिस हा शब्द तयार झाला.या देवीच्या डोळ्यावर कायम पट्टी असायची,याचा अर्थ न्यायदेवी नेहमी निष्पक्ष राहून न्याय करेल.कोणाला पाहून न्याय करताना निर्णय एकाच्या बाजूने दिला जाऊ शकतो; यासाठी ही पट्टी बांधण्यात आली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!