- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
पुणे :-हल्ली रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसागणिक वाढतच चालले आहे.चालकासह मागे बसलेल्या सोबत्याचेही मृत्यू तसेच जखमींमध्ये वाढ होत असल्याने विनाहेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या दोघांना हेल्मेट अनिवार्य असून,हेल्मेट नसल्यास कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त आणि अधीक्षकांना दिले आहेत.
सहप्रवाशांवर ‘स्वतंत्र हेड’ खाली कारवाई होणार असून,त्यासाठी ‘ई चलन’ मशिनमध्ये बदल करण्यात आला आहे.सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांनी पुण्यासह राज्यातील विविध शहरांमध्ये आरटीओ, पोलिस,जिल्हा प्रशासन यांची काही दिवसांपूर्वी संयुक्त बैठक घेतली होती.त्यामध्ये त्यांनी अपघातांचा आढावा घेतला.त्या वेळी त्यांना अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले होते.अशातच बऱ्यापैकी हेल्मेटचा वापर केला जात नसल्याने हेल्मेटचा वापर करावा,अशा सूचना दिल्या होत्या.त्यानुसार राज्याचे वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालकांनी दुचाकीस्वार आणि सहप्रवासी या दोघांना हेल्मेट बंधनकारक करावे.
हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी; असे आदेश दिले आहेत. ‘मोटार वाहन कायदा’ १९८८च्या कलम १२८ आणि १२९ च्या तरतुदीप्रमाणे विनाहेल्मेट दुचाकीस्वार व सहप्रवासी यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने दिलेले उद्दिष्ट व सूचनांची माहिती सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी करून घ्यावी; असे अप्पर पोलिस महासंचालकांनी पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
वाहतूक नियभंगाच्या केस करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘ई-चलन मशीन’ मध्ये विना हल्मेट दुचाकीस्वार व विनाहेल्मेट सहप्रवासी या दोन्ही केसची कारवाई या एकाच ‘हेड’ खाली केली जात होती.त्यामुळे विनाहेल्मेट सहप्रवासी व विनाहेल्मेट दुचाकीस्वार यांची वेगवेगळी माहिती मिळत नव्हती.त्यामुळे आता या ‘ई-चलन’ मशीनमध्ये बदल करण्यात आला आहे.यापुढे विनाहेल्मेट दुचाकीस्वार आणि विनाहेल्मेट सहप्रवासी अशा दोन वेगवेगळ्या हेडखाली कारवाई केली जाणार आहे.
- Advertisement -