- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शासन स्तरावरून रस्ते अपघातातील जखमींसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात.अशातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएमओ कार्यालय सेवा तीर्थ येथून रविवार,१५ फेब्रुवारी रोजी रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांच्या उपचारासाठी “पीएम राहत”(PM RAHAT)योजनेला मंजुरी दिलीआहे.पीएम राहत म्हणजेच रोड ॲक्सिडेंट व्हिक्टिम हॉस्पिटलायझेशन अँड ॲश्युअर्ड ट्रीटमेंट.या योजनेंतर्गत कोणत्याही प्रकारच्या रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला १ लाख ५० हजार रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार मिळणार आहेत.जखमी व्यक्ती अपघात झाल्यापासून सात दिवसांपर्यंत कॅशलेस उपचारांची सुविधा घेऊ शकेल.जीवघेण्या नसलेल्या प्रकरणांमध्ये २४ तासांपर्यंत दाखल होण्याची आणि गंभीर,जीवघेण्या प्रकरणांमध्ये ४८ तासांपर्यंत दाखल होण्याची सुविधा मिळेल.सदर योजनेत उपचारांची भरपाई रुग्णालयांना मोटर व्हेईकल ॲक्सिडेंट फंडामधून दिली जाईल.या योजनेच्या माध्यमातून गोर-गरीब तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरदृष्टीकोण तसेच नागरिकांसाठी असलेली तळमळ लक्षात येते.
- Advertisement -

