Wednesday, September 23, 2026
Homeगडचिरोलीआता एमआरपीपेक्षा अधिक दराने खते विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासह परवाना...

आता एमआरपीपेक्षा अधिक दराने खते विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासह परवाना रद्द करण्याची कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे,खते व कीटकनाशके वेळेत आणि योग्य दरात उपलब्ध व्हावीत,तसेच बोगस बियाणे विक्री,साठेबाजी आणि जादा दराने खतविक्रीच्या प्रकारांना आळा बसावा यासाठी एमआरपीपेक्षा अधिक दराने खते किंवा बियाण्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासह परवाना रद्द करण्याची कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित “कृषी निविष्ठा उपलब्धता व गुणवत्ता नियंत्रण” विषयक जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते.बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर,जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी किरण खोमणे, मोहीम अधिकारी,जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक,कृषी विभागाचे अधिकारी,बियाणे व खत कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच जिल्हा डीलर्स व रिटेलर्स असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की,गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख पीक धान असून बहुतांश शेतकरी खरीप हंगामावर अवलंबून आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरील भरारी पथके अधिक सक्रिय करण्यात येणार आहेत.कोणताही विक्रेता छापील कमाल किरकोळ किंमतीपेक्षा (एमआरपी)अधिक दराने विक्री करत असल्याचे अथवा कृत्रिम टंचाई निर्माण करत असल्याचे आढळल्यास त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल.
बैठकीत कृषी निविष्ठांच्या विक्रीतील अनियमितता रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.खत किंवा बियाण्यांसोबत इतर अनावश्यक उत्पादने खरेदी करण्याची सक्ती शेतकऱ्यांवर करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.तसेच कृषी केंद्रांमधील उपलब्ध साठ्यांची नियमित तपासणी करून बियाणे व खतांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण व्हावे यासाठी जिल्हास्तरावर विशेष निविष्ठा तक्रार निवारण कक्ष कार्यरत करण्यात आला आहे.बियाणे,खते किंवा कीटकनाशकांबाबत कोणतीही तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी थेट कृषी विभागाशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले.तक्रार निवारण कक्षाचा मोबाईल क्रमांक 8275690169 उपलब्ध करून देण्यात आला आहे.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.सध्या जिल्ह्यात १ हजार ४९४ मेट्रिक टन युरिया आणि २०० मेट्रिक टन डीएपी खताचा बफर साठा उपलब्ध आहे.पावसाळ्यात दुर्गम भागातील वाहतूक अडचणी लक्षात घेऊन संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त खतसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता गरजेनुसारच खतांची खरेदी करावी,असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
खरीप हंगाम कोणत्याही अडचणीशिवाय यशस्वी करण्यासाठी महसूल,कृषी आणि पोलीस प्रशासनाने परस्पर समन्वय राखून काम करावे,अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!