- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सोन्या-चांदीचे दर हे दिवसातून दोनदा जारी करण्यात येतात.त्यामुळे दुपारी वाढलेला भाव पटकन सायंकाळच्या सुमारास कमी-अधिक प्रमाणात झालेला दिसून येत असल्याने अनेकजण संभ्रमात पडतात.सोने-चांदीचे दर पहिल्यांदा दुपारी १२ वाजताच्या सुमारास तर दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजताच्या जवळपास जारी केले जातात.सदरचे दर हे ‘आयबीजेए’ या व्यवसायिक संघटनेकडून निश्चित केले जातात.आयबीजेए(IBJA-India Bullion and Jewellers Association Ltd.)ही एक व्यवसायिक संघटना असून भारतातील सोन्या-चांदीच्या दरांबाबत माहिती देत सराफा व्यापाऱ्यांसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते.त्यातच आज,शुक्रवार ७ नोव्हेंबरला सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरण तर झाली; मात्र,३ टक्के जीएसटीमुळे अद्याप सोने-चांदी लाख मोलाचेच असल्याचे दिसून येत आहे.आज शुक्रवारी
२४ कॅरेट सोन्याचा भाव ४३९ रुपयांनी स्वस्त होऊन १ लाख २० हजार २३१ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला.पण,३ टक्के जीएसटी पकडले तर सोन्याचा भाव १ लाख २३ हजार ८३७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.तर,चांदीचा भाव जीएसटीसह १ लाख ५२ हजार ४५० रुपये प्रति किलो आहे.आज चांदी जीएसटीशिवाय २३२ रुपयांनी घसरून १ लाख ४८ हजार १० रुपये प्रति किलो दराने नोंदवल्या गेली.विशेष म्हणजे,सध्या स्थितीत सोन्याचा भाव १७ ऑक्टोंबरच्या विक्रमी उच्चांकावरून १० हजार ६४३ रुपयांनी स्वस्त झाला आहे; तर चांदीचा भाव १४ ऑक्टोंबरच्या विक्रमी उच्चांकावरून ३० हजार ९० रुपयांनी उतरले आहे.
- Advertisement -

