Tuesday, July 14, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज पीएम किसानचे दोन हजार मिळणार; तर नमो शेतकरी योजनेचे दोन हजार...

आज पीएम किसानचे दोन हजार मिळणार; तर नमो शेतकरी योजनेचे दोन हजार कधी येणार?..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २२ व्या हप्त्याच्या दोन हजार रुपयांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून आज,शुक्रवार १३ मार्च रोजी ज्योती बिश्नु आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र,खानापारा,गुवाहाटी (आसाम)येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  योजनेच्या २२ व्या हप्त्याची रक्कम देशभरातील ९ कोटी ३२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली जाणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देशभरात करण्यात येणार असून राज्यातील व विविध जिल्ह्यातील पात्र शेतकरी कुटुंबांनाही या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.या अनुषंगाने विविध स्तरांवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.जिल्हा,तालुका व ग्रामपंचायत स्तरावर,कृषी विज्ञान केंद्र,कृषी उत्पन्न बाजार समिती, विविध शासकीय कार्यालये,संशोधन केंद्रे,शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs),शेतकरी उत्पादक संघटना (FPOs)तसेच सहकारी पतसंस्था(PACS) येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.पीएम किसान सन्मान निधी योजनेला सात वर्ष पूर्ण झाली आहेत.पीएम किसान योजनेच्या २२ व्या हप्त्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून १८ हजार ६४० कोटी रुपये वर्ग केले जातील.त्यानुसार, आज शुक्रवारी सांयकाळी ५ वाजता हा कार्यक्रम सुरु होणार आहे.विशेष म्हणजे, योजनेच्या २१ व्या हप्त्याची रक्कम १९ नोव्हेंबर २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत करण्यात आली होती.आज पीएम किसानचे दोन हजार मिळणार,तर नमो शेतकरी योजनेचे दोन हजार कधी येणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केलेली आहे.या योजनेतून आतापर्यंत ७ हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. सातव्या हप्त्याची रक्कम ९ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आली होती.या योजनेचे महाराष्ट्रात ९१ लाख शेतकरी लाभार्थी आहेत.अश्यातच आता चालू आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवस शिल्लक असल्याने काही दिवसांमध्ये सरकार नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांना देणार काय?याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!