Tuesday, September 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआजपासून पुढील चार दिवस पाऊस घालणार थैमान..

आजपासून पुढील चार दिवस पाऊस घालणार थैमान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात पावसाची उघडीप सुरू असतांनाच परत पुन्हा आज,शनिवार ५ जुलैपासून ते ९ जुलैपर्यंत पाऊस थैमान घालणार आहे.याबाबत प्रादेशिक हवामान केंद्र व पृथ्वी मंत्रालयाने हवामान अंदाजाची अधिकृत घोषणा केली आहे.अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे पश्चिम बंगाल व आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून कोकण,मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.तसेच ४५ ते ५५ किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील व संपूर्ण कोकण किनारपट्टी,उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार आहे.त्यानुसार आज,शनिवार ५ जुलै रोजी सिंधुदुर्ग,रत्नागिरी, रायगड,ठाणे,पालघर तसेच नाशिक,पुणे,सातारा व कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.तर मुंबई,नंदुरबार,धुळे, जळगाव,छत्रपती संभाजीनगर,जालना,परभणी व हिंगोली इत्यादी जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
उद्या,रविवार ६ जुलै रोजी पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट,मुंबई वगळता संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट,कोल्हापूर,सातारा आणि नाशिकच्या घाटमाथ्यावरही तुफान पावसाचा ऑरेंज अलर्ट तर बीड,नांदेड,परभणी,हिंगोली,जालना,छत्रपती संभाजीनगर,जळगाव,धुळे,नंदुरबार,वर्धा,नागपूर, भंडारा,गोंदिया,चंद्रपूर व गडचिरोली इत्यादी जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.तर सोमवार ७ जुलै रोजी पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट तर रत्नागिरी, रायगड,भंडारा गोंदिया,नाशिक व साताऱ्याचा घाटमाथा ऑरेंज अलर्ट आणि मुंबई,ठाणे,पालघर,नाशिक,नंदुरबार,धुळे,जळगाव, छत्रपती संभाजीनगर,जालना,परभणी,हिंगोली,नांदेड, नागपूर,वर्धा,चंद्रपूर, गडचिरोली इत्यादी जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.तसेच मंगळवार ८ जुलै रोजी रत्नागिरी गोंदिया व सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, रायगड सिंधुदुर्ग नागपूर,भंडारा,चंद्रपूर,गडचिरोली तसेच कोल्हापूर व पुणे घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.त्याचप्रमाणे बुधवार ९ जुलै रोजी तळ कोकणासह पुढे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावरील व नागपूर,भंडारा,गोंदिया यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!