- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-शहराच्या मुख्य बसस्थानक आगारात बसची वाट पाहण्यासाठी उभ्या असलेल्या प्रवाश्यांना बसने धडक दिल्याने घडलेल्या अपघातात चार प्रवासी जखमी झाल्याची घटना आज,रविवार १० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.उर्मिला चनेकार वय ५५ वर्षे,निर्मला बाबनवाडे वय ५२ वर्षे,अविक बाबनवाडे वय ३ वर्षे,तृप्ती चनेकार वय १४ वर्षे अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार,गडचिरोली आगारातून एमएच ०७ सी ९०७७ क्रमांकाची बस आज रविवारी दुपारच्या सुमारास आरमोरी-देलोडा मार्गावर धावण्यासाठी बस फलाटावर उभी होणार होती.बस चालक बंडू खांडरे वय ५६ वर्षे रा.गडचिरोली यांनी फलाटावर बस लावण्याचा प्रयत्न केला असता धावत्या बसचे ब्रेक न लागल्याने बस अनियंत्रित झाली.त्यामुळे बसची वाट पाहत असलेल्या चार प्रवाशांना बसची धडक बसली. बसची धडक बसताच आगारातील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती गडचिरोली पोलिसांना देण्यात आली.अश्यातच वेळ वाया न घालविता जखमींच्या मदतीला गडचिरोली शिवसेना युवासेनेचे(उबाठा गट)पवन गेडाम यांचेसह तालुका प्रमुख कुणाल कोवे, शहर प्रमुख पप्पू शेख यांनी तत्परता दाखवत चारही जखमींना आपल्या खाजगी वाहनाने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.चारही जखमींवर उपचार सुरू असून पोलिसांनी बस चालकास ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात नेत तपासणी अहवालानुसार बस चालकावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
- Advertisement -

