Saturday, August 1, 2026
Homeवरोराआई-वडिलांसोबत राहणाऱ्या २४ वर्षीय युवतीची भरदिवसा धारधार शस्त्राने हत्या..

आई-वडिलांसोबत राहणाऱ्या २४ वर्षीय युवतीची भरदिवसा धारधार शस्त्राने हत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

वरोरा(चंद्रपूर) :- प्रसिद्ध समाजसेवक दिवंगत बाबा आमटे स्थापित गजबजलेल्या आनंदवनातील वसाहतीत आई-वडिलांसोबत राहणाऱ्या एका युवतीची भरदिवसा धारधार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना २६ जूनच्या रात्री ९ वाजता उघडकीस आली.आरती दिगंबर चंद्रवंशी वय २४ वर्षे असे मृतक युवतीचे नाव आहे.

हत्येनंतर आरोपी युवतीचा मोबाइल घेऊन फरार झाला. आनंदवनातील संधीनिकेतन शाळेजवळील वसाहतीत दिगंबर चंद्रवंशी हे पत्नी व मुलगी आरतीसह बऱ्याच वर्षांपासून वास्तव्याला आहेत. दिगंबर व त्यांची पत्नी दिव्यांग आहे.२६ जूनला सकाळी आई-वडील काही कामानिमित्त सेवाग्राम येथे गेले.त्यावेळी आरती घरी एकटीच होती.दुपारी ४ वाजेच्या सुमारास वडील दिगंबर यांनी आरतीला अनेकदा फोन केला.मात्र,तिचा भ्रमणध्वनी बंद असल्याचे आढळून आले.सेवाग्राम येथील काम आटोपून रात्री ९ वाजता दोघेही पती-पत्नी आनंदवन वसाहतीमधील आपल्या खोलीत आले.दरवाजा उघडून आत गेले असता मुलगी आरती ही स्नानगृहात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून हंबरडा फोडला. या घटनेची माहिती वरोरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता धारदार शस्त्राने वार करून आरतीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले.आनंदवनात दिवसभर रेलचेल असताना भरदिवसा युवतीची हत्या होणे याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पोलिसांनी आनंदवनातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.दरम्यान, पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,अप्पर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम, पोलिस निरीक्षक अमोल काचोरे आदींनी घटनास्थळी भेट दिली.चंद्रपूर गुन्हे शाखेच्या पथकाला पाचारण करून तातडीने तपास सुरू केला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन चिमुकल्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू; आज दुपारच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील मौजा-खेडेगाव येथे आज,शनिवार १ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी...

अखेर पुरात वाहून गेलेल्या ‘त्या’ इसमाचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथे अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यात पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असतांनाच अखेर...

युरोप आणि चीन दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदेशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतात.सन २०२६-२७ साठी राज्य पुरस्कृत या योजनेत युरोप, चीन या...

कर्जमाफी योजनेतील ३ हजार ८१२ शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाने २ जून आणि १५ जुलै २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ जाहीर केली आहे.या योजनेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!