उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- चामोर्शी तालुक्यातील तिर्थक्षेत्र मार्कंडा देव येथील ग्रामपंचायत भवनात काल १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम मार्कंडा देव ग्रामपंचायतीच्या सरपंचा संगीता मोगरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेेस माल्यार्पण करुन अभिवादन केले.यावेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग चे छबिलदास सुरपाम, ग्रामपंचायत सदस्य वर्षा सरपे,प्रियंका मरस्कोले, लिलाधर मरसकोल्हे,देवा तिवाडे आदी ग्रामपंचायत सदस्य तथा गावकरी उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

मार्कंडेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारा जवळ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचीत साधुन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे छबिलदास सुरपाम तथा मंदिर सुरक्षा रक्षकांनी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले

