Monday, August 24, 2026
Homeगडचिरोलीअस्थिव्यंगाच्या रुग्णांसाठी उपचाराची नवी दारे.. गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच गुडघा प्रत्यारोपण...

अस्थिव्यंगाच्या रुग्णांसाठी उपचाराची नवी दारे.. गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
​गडचिरोली :-जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे प्रथमच ‘टोटल नी रिप्लेसमेंट'(गुडघा प्रत्यारोपण)(Total Knee Replacement)ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया असून,यामुळे जिल्ह्यातील अस्थिव्यंगाच्या रुग्णांसाठी उपचाराची नवी दारे उघडली गेली आहेत.
  • ​ शस्त्रक्रियेचे तपशील व महत्त्व👇
​अत्याधुनिक उपचार : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.छाया उईके यांच्या मार्गदर्शनाखाली आता गडचिरोलीतच गुडघा प्रत्यारोपणासारखी मोठी शस्त्रक्रिया शक्य झाली आहे.
​ तज्ज्ञ वैद्यकीय चमू : या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ,भूलतज्ज्ञ आणि ऑपरेशन थिएटरमधील सुश्रुषा कर्मचारी यांच्या चमूने मोलाची भूमिका बजावली.
​ सर्वसामान्यांना लाभ : खासगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च येणारी ही शस्त्रक्रिया आता शासकीय रुग्णालयात उपलब्ध झाल्याने दुर्गम भागातील गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
​या यशाबद्दल बोलतांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे म्हणाल्या की, “जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार आणि तज्ज्ञ आरोग्य सेवा स्थानिक स्तरावरच मिळावी,यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.ही पहिली यशस्वी शस्त्रक्रिया आमच्या पूर्ण टीमच्या जिद्दीचे फळ आहे.”
​अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.छाया उईके यांनी या यशाबद्दल पूर्ण टीमचे कौतुक केले असून, आगामी काळात अशा अनेक आधुनिक शस्त्रक्रिया रुग्णालयात नियमितपणे राबवल्या जातील,असा विश्वास व्यक्त केला.
​या ऐतिहासिक कामगिरीबद्दल जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले आहे,असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नैनपूरच्या विद्यार्थ्यांचा ‘सीमेवरील जवानांसाठी प्रेमाची राखी’ उपक्रम; जवानांना पाठवल्या राख्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड येथे आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा,सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना...

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!