Tuesday, July 14, 2026
Homeगडचिरोलीअवैध रेती साठाप्रकरणी २९ कोटी ३६ लाखाच्यावर दंड.. - २ जेसीबी,१...

अवैध रेती साठाप्रकरणी २९ कोटी ३६ लाखाच्यावर दंड.. – २ जेसीबी,१ पोकलैंड आणि ५ ट्रक जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सिरोंचा उपविभागातील अवैध गौण खनिज प्रकरणात जिल्हा प्रशासनाने तपासणीची कारवाई करत १५ हजार ६६५ ब्रास अवैध रेतीसाठा व वाहने जप्त केली आहेत.सिरोंचा विभागात अवैध रेती तस्करीबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त होत असल्याने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा अहेरीचे उपविभागीय अधिकारी कुशल जैन यांना याबाबत विशेष तपासणी करण्याचे  निर्देश् दिले होते.
कुशल जैन यांच्या पथकाने २ ऑक्टोंबर २०२५ रोजी अंकिसा माल,चिंतरेवला व मद्दीकुंठा येथे तपासणीची कारवाई केली.यावेळी अंकिसा माल येथे सर्व्हे नंबर ९०८ मधील रेती साठ्यात ६४ ब्रास आणि सर्व्हे नंबर ६९० व ६९१ मधील साठ्यात ५९ ब्रास रेतीची तफावत(कमी साठा)आढळली आहे.या दोन्ही प्रकरणात चौकशी करण्यात येत आहे.तर मद्दीकुंठा येथील सर्व्हे नंबर ५३३ मध्ये परवानगी असलेल्या ठिकाणी भेट दिली असता, रेतीसाठा दुसऱ्याच जागेवर म्हणजेच सर्व्हे नंबर ३५६ जागेवर असल्याचे आढळले.मोजमाप अहवालानुसार,या ठिकाणी एकूण १५ हजार ६६५ ब्रास रेतीसाठा दिसून आला. साठवणूक आणि वाहतुकीसाठी संबंधितांकडे कोणताही वैध परवाना उपलब्ध नसल्यामुळे,हा साठा अवैध घोषित करून जप्त करण्यात आला.याशिवाय, गौण खनिज उत्खनन व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली २ जेसीबी मशीन,१ पोकलैंड मशीन आणि ५ ट्रक ही वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.
तहसिलदार सिरोंचा यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) व ४८(८)मधील तरतुदीनुसार पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय अधिकारी,अहेरी यांचेकडे अहवाल सादर केला आहे. त्यात जप्त केलेल्या १५ हजार ६६५ ब्रास अवैध साठ्यासाठी प्रति ब्रास १८ हजार ६०० रुपये दंड (पेनल्टी)प्रमाणे एकूण अंदाजित रक्कम २९ कोटी ३६ लाख ५६ हजार ८०० रुपये दंड प्रस्तावित करण्यात आला आहे.अंतिम सुनावणी आणि अपीलाच्या अधीन राहून ही दंडाची रक्कम निश्चित होईल.या सर्व प्रकरणात चौकशी सुरू असल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी कुशल जैन यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!