उद्रेक न्युज वृत्त
अमरावती :- पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आणि भाजप उमेदवार ऱणजित पाटील यांच्यात थेट लढत झाली.तब्बल ३० तासानंतर निवडणुकीचा निकाल लागला आहे. निवडणुकीत अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झाले असून त्यांनी भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे.धीरज लिंगाडे यांना एकूण ४६३४४ मते पडली, तर भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांना ४२९६२ मत मिळाली.धीरज लिंगाडे यांनी ३३८२ मतांनी विजय मिळवला आहे.अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार डॉ.रणजित पाटील यांचा पराभव केला आहे.रणजीत पाटील निवडून यावेत म्हणून फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी ताकद पणाला लावली होती.तर लिंगाडे यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अचूक नियोजन केले होते.