उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- ‘वर्षा बंगल्याचे ४ महिन्यात खानपानाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये खर्च करणे ही नवलाची बाब असून मी सुद्धा उपमुख्यमंत्री होतो.आमचे सहकारी मुख्यमंत्री होते.परंतु ४ महिन्यातील बील एवढे कसे? चहामध्ये सोन्याचे पाणी घातले होते काय? काही कळायला मार्ग नाही.करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी शिंदे फडणवीस सरकार वैयक्तिक रित्या करीत आहेत.”असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर खोचक टोला व टीका केली आहे.
अजित पवार म्हणाले,गेल्या ८ महिन्यात ५० कोटी राज्य सरकारने जाहीरातीवर खर्च केला.मुंबई महानगर पालिका कडून माहीती घेतली तर १७ कोटी रुपये जाहीरातींवर खर्च केला गेला आहे.एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले परंतु,पानभर जाहीराती देवून उधळपट्टी होत आहे.सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशन सुरू होणार आहे.त्यापूर्वी आज विरोधी पक्षांनी अधिवेशनातील रणनितीबाबत बैठक घेतली. बैठकीला राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल करतांना ते बोलत होते.