उद्रेक न्युज वृत्त
नागपूर: – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने विविध शहरांतील ढोल पथकांकडून वादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात येत आहे.नागपूरच्या अनिल देशमुख या शिवप्रेमी तरूणाने एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.त्यांनी चक्क आपल्या घरावरच शिवाजी महाराजांचा १४ फुटांचा अश्वरूढ पुतळा उभारला.हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून शिवपूजन करीत शिवजयंती साजरी केली.
अनिल देशमुख यांचे घर लोकांसाठी कुतूहल आणि अभिमानाचा विषय बनला आहे.त्यांच्या घरासमोरून जाणारा प्रत्येकजण सन्मानाने झुकतो अन् नमस्कारही करतो आहे.हा नमस्कार असतोय छत्रपती शिवाजी महाराजांना.अनिल देशमुख हे हुडकेश्वर पिंपळ रोड येथे राहत असून त्यांचा एक ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे.अनिल यांनी आपल्या घरावरच छत्रपतींचा १४ फुटांचा सुंदर पुतळा बसवला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करुन अभिवादन केले.
अनिल यांना लहानपणापासूनच छत्रपती शिवरायांचा इतिहास,व्यक्तीमत्व आणि विचारांविषयी प्रचंड आकर्षण आणि अभिमान होता. यातूनच घर बांधतांनाच शिवरायांचा पुतळा उभारण्याचा विचार त्यांच्या मनात आला.